मनसे जिल्हा कार्यकारिणीची बैठक,फलकाचे अनावरण

0
13
गोंदिया,दि.09ः- नुकतीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची गोंदिया जिल्हा कार्यकारिणी बैठक शासकीय विश्रामगृहात पार पडली. बैठकीला उपस्थित मनसेचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांनी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना महत्वाच्या सूचना केल्या.जनतेत जाऊन लोकांचे प्रश्न सोडविण्यासोबतच संपर्क ठेवण्याचे निर्देश दिले. नागपूर मेट्रोमधे मराठी भाषेचा वापर असो अथवा मराठी मुलांना रोजगार तसेच नागपुरात केलेले इतर आंदोलन कसे याश्वस्वी झाले त्याचा मूलमंत्र  गडकरी यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला.येत्या जानेवारीत राज ठाकरे महाराष्ट्र दौर्यावर निघणार असून त्यासाठी सज्ज राहण्याचा सल्ला दिला.बैठकीपुर्वी तिरोडा मार्गावरील कुडवागावाजवळ मनसेच्या फलकेचा अनावरण गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी मनसे गोंदिया जिल्हाध्यक्ष मनीष चौरागडे, उप जिल्हाध्यक्ष मिलन रामटेककर, मुकेश मिश्रा, मुन्ना गवळी, लेखू रहांगडाले, तालुका अध्यक्ष ब्रिजभूषण बैस, शैलेश जांभूळकर, सुरेश ठाकरे, खुशाल राउत, शहर अध्यक्ष उदय पोफळी तसेच राजेश नागोसे, अभय कुरंजेकर, राहुल हटवार, हमीद शेख, शहीद पठाण, निखील ढोंगे, क्षितीज वैद्य व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.