समाज विकासासाठी फुले,आंबेडकरांचे मूलमंत्र स्वीकारा-देशमुख

0
20

पोवार ईरा व चक्रवती राजाभोज जयंती उत्साहात
पटोलेनी दिला खासदार निधीतून ३० लाखाचा निधी
डव्वा-पोवार समाजाचा इतिहास कुणी कितीही सांगत असले तर आपला इतिहास हा खूप मोठा आहे.राजस्थान,गुजरात,मध्यप्रदेशातील सीमावर्ती भागात राज्याच्या संरक्षणासाठी लढणारा आणि सुख शांतीने राज्य चालविणाèया चक्रवर्ती राजाभोजांच्या पोवार समाजाने प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर राहिले पाहिजे.यासाठी महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक महात्मा फुल्यांना दिलेला शिक्षणाचा मूलमंत्र आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या समाजाला जागृत करण्यासाठी शिका,संघटित व्हा आणि संघर्षाचा दिलेला मंत्र आज आपल्या समाजाला सुध्दा स्वीकारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन बैहर पवार समितीचे अध्यक्ष उमेश देशमुख यांनी केले.
ते सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वा येथे राष्ट्रीय पोवार क्षत्रीय महासभा द्वारा संचालित क्षत्रीय राजाभोज पोवार सांस्कृतिक पर्यटन केंद्र सडक अर्जुनीच्यावतीने राजाभोज नगरी येथे आयोजित पोवारी ईरा २०१५ कार्यक्रम व चक्रवती राजाभोज जयंती समारोहाचे स्वागताध्यक्ष म्हणून बोलत होते. सकाळी ११ वाजता बालाघाटचे खासदार बोधqसह भगत यांच्या हस्ते राजाभोज qदडीचे उदघाटन मातामाय व राजाभोज प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.यावेळी पवार महासभेचे अध्यक्ष डॉ.बी.एम.शरणागत होते.राजाभोज qदडीचे उदघाटन केल्यानंतर ही समाजातील विविध रूप दाखविणारी सांस्कृतिक qदडी गावफेरी करीत कार्यक्रमस्थळी पोचली.त्यानंतर आयोजित कार्यक्रमाचे उदघाटन राष्ट्रीय पवार क्षत्रीय महासभेचे माजी अध्यक्ष इंजी.टी.डी.बिसेन यांच्या हस्ते राजाभोज स्मारक समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष कन्हैयलाल बोवाडे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.स्वागताध्यक्ष म्हणून बैहर पवार राम मंदिर समितीचे व पवार समितीचे अध्यक्ष उमेश देशमुख होते.यावेळी बोलतांना देशमुख यांनी समाजाच्या इतिहासाची माहिती देत आपल्या समाज हिताचा विचार करीत असतानाच आपले बंधू असलेल्या इतर समाजाचा सुध्दा विचार करावा त्यांच्या द्वेष बाळगू नये असे आवाहन केले.माळी समाजात महात्मा फुल्यांनी,दलित समाजात बाबासाहेबानी,लोधी समाजात राणी अवंतीबाईचे जसे योगदान समाज उत्थानात आहे,तसेच योगदान आपल्या समाजासाठी चक्रवर्ती राजाभोजचे आहे,हे सुध्दा आपल्या पिढीने विसरता कामा नये असे म्हणाले.यावेळी बोलतांना इंजि.बिसेन यांनी आपल्या समाजाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असून आत्तापर्यंत ८४ पेक्षा अधिक ग्रंथ समाजाच्या इतिहासाची माहिती देणारे उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगितले.कुठेही राममंदिर नसताना १९०९ मध्ये बैहर येथे समाजाने पहिले पवार राम मंदिर बांधले ते सुध्दा पवार समाजाच्या मालकीचे असे सांगून आपला समाज हा देशाच्या चारही बाजूला विखुरलेला असून त्यास एका माळेत गुंफण्याचे काम व्हायला हवे असे म्हणाले.कार्यक्रमाचे अध्यक्ष कन्हैयालाल बोवाडे यांनी संस्कृती रक्षण महत्त्वाचे असल्याचे विचार व्यक्त करीत आपल्या मातीचा जो सन्मान करतो तोच खरा भूमिपुत्र म्हणविला जातो आणि आपला समाज हा भूमिपुत्राचा आहे.यावेळी अनिल देशमुख ,गुलाब बोपचे यांनीही विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाला पोवार महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष गुलाब बोपचे, भोजराज बिसेन, केतन तुरकर, पंकज पटले,बेरार टाईम्सचे संपादक खेमेंद्र कटरे,प्रकाश रहांगडाले, विजय पारधी, डी.डी. पटले, भुमेश्वर चव्हाण, अरqवद बिसेन, राजेश रहांगडाले, भरत बोपचे, डॉ. उमेंद्र चौधरी,डी.यु.रहांगडाले,अनिल रहांगडाले,योगेश्वरी पटले,डी.बी.रहागंडाले,मंदा चौधरी,गायत्री पारधी,सौ.कमलेश्वरी गौतम,अनिल बिसेन,स्वप्निल पटले यांच्यासह समाजातील मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन किशोर पटले,पुनम पटले यांनी केले.प्रास्तविक विलास चव्हाण यांनी केले तर आभार लिलेश रहागंडाले यांनी मानले. आयोजनासाठी सुदाम पटले,सोहनलाल चौध़री,उमराव चौधरी,कुवरलाल चौधरी,भाऊराव चौधरी,हिवराज चौधरी,सचिन रहांगडाले,विनोद पटले,संतोष पटले,नितीन येळे,माया चौधरी,भुमेश्वरी गौतम,सीता पटले,प्रमिला पारधी,शालिनी चौधरी,योगेश्वरी चौधरी,लक्ष्मी रहागंडाले,मुन्नालाल चौध़री,डॉ.चुनेश्वर पटले,ज्ञानेश्वर ठाकरे,शैलेष चौधरी यांच्यासह स्थानिक आयोजन समितीच्या सदस्यांनी सहकार्य केले.