वाढत्या वायु प्रदूषणामुळे पशुपक्षांसह जनजीवनावर विपरीत परीणाम : राम धनगर

0
10
 *वळणरस्ता  आणि सिग्नल यंत्रणा शहरात कार्यान्वित करण्यासंदर्भात सावली प्रतिष्ठानचे निवेदन*
आकाश पडघन
वाशिम,दि.19ः-वाशीम शहरातील महत्वाच्या चौकामध्ये दिवसेदिवस रहदारीचे प्रमाण वाढत असुन त्यामुळे प्रचंड वाहतुक कोंडी होत असुन अलिकडच्या काळात रस्त्यावरील अपघाताचे व प्रदूषणाचे प्रमाण वाढलेले आहे. हे टाळण्यासंदर्भात बायपास आणि सिग्नल यंत्रणा शहरात कार्यान्वित करण्यासाठी स्थानिक निसर्ग व्यासंगी सावली प्रतिष्ठानने जिल्हा प्रशासनाला निवेदनाद्वारे मागणी केली आहे. दरम्यान जिल्हानिर्मीतीला 20 वर्षांचा कालावधी पुर्ण होत असतानाही अजुनही वाशीम शहरात रस्त्यावरील रहदारीची समस्या सुटलेली नाही आहे. शहरातील पोस्ट आॅफीस, पाटणी चैक, बसस्थानक, अकोला नाका, पुसद नाका व हिंगोली नाका परीसरातील रोडवर बाहेर राज्यातुन मालवाहतुक करणाऱ्या अवजड वाहणामुळे वाहुतुकीस प्रचंड कोंडी निर्माण होत असुन शहरातील चाकरमानी,विद्यार्थी व नागरीकांना रहदारी व प्रदूषणाचा प्रचंड त्रास सहण करावा लागत आहे. अलिकडच्या काळात याच अवजड वाहतुकीमुळे अपघात घडलेले असून कित्येकजण मृत्युमुखी पडले आहेत. शहरातुन जात असताना मालवाहतुक करणारे ट्रकचालक मर्यादीत वेगापेक्षा अतिरिक्त वेगाने निष्काळजीपणे वाहणे चालवतात त्यामुळे लहान वाहनांना व शालेय विद्याथ्र्यांना बऱ्याचवेळा अपघातास सामोरे जावे लागते.
 वाशिमम शहराच्या बाहेर मंजुर झालेला बायपास (वळण रस्ता) चे काम पुर्ण करून वाहतुक नियमणासाठी देण्यात येणारा १० टक्के निधी सिग्णल यंत्रणेसाठी वापर करून वाहतुक कोंडी आणि दिवसेंदिवस वाढत चाललेल्या प्रदुषण आणि अपघाताच्या प्रमाणापासुन नागरिकांची सुटका करण्यात यावी ही मागणी सावली प्रतिष्ठानने निवेदनाद्वारे केली आहे. दिनांक १५ सप्टेंबर रोजी सावली प्रतिष्ठानचे अध्यक्ष राम धनगर यांना पोस्ट ऑफिस परीसरातील रस्ता ओलांडत असताना अवजड वाहनाचा धक्का लागून रस्त्याच्या एका बाजुला दुचाकीसह पडले होते वाहतूक पोलिस कर्मचारी ईंगोले आणि जाधव यांच्या सतर्कतेमुळे कुठल्याही गंभीर दुखापत झाली नाही म्हणून अशा घटना टाळण्यासाठी सिग्नल यंत्रणा व बायपास आवश्यक आहे अशी स्थानिक नागरीकांची मागणी आहे. निवेदन देतेवेळी सावली प्रतिष्ठानचे अध्यक्ष राम धनगर, सुनिल हेंद्रे वैभव गौरकर,रुपेश काबरा,प्रवीन होनमने,शंकर कालापाड,अजय यादव,रोहिदास धनगर, रश्मि मोहटे, रविकिरण शिरसाट,आदी सदस्तांची उपस्थिती होती.