काँग्रेसच्या मदतीने जि.प.उपाध्यक्षपदी भाजपचे हमिद अल्ताफ अली

0
6
गोंदिया,दि.15- गोंदिया जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदासाठी आज सोमवारी (दि.15) घेण्यात आलेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे चिचगड जि.प. क्षेत्राचे सदस्य हमिद अल्ताफ अकबर अली यांची वर्णी लागली आहे.त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे गंगाधर परशुरामकर यांचा 13 मतांनी पराभव केला.भारतीय जनता पक्षाला पुर्ण पाठिंबा द्यायला राष्ट्रवादी काँग्रेस तयार असतानाही भाजपने मात्र राष्ट्रवादीसोबत न जाता काँग्रेससोबत जात मागील युती कायम ठेवण्याचा निर्धार घेतला होता.त्यामुळे उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसने आपल्या पक्षाच्या उमेदवाराचा दाखल केलेला अर्ज मागे घेत भाजपला समर्थन दिले.या विजयासाठी भाजपचे विधानपरिषद सदस्य डाॅ.परिणय फुके,तिरोडा-गोंदियाचे आमदार विजय रहागंडाले,देवरी-आमगावचे आमदार संजय पुराम,जिल्हाध्यक्ष हेमंत पटले,माजी खासदार डाॅ.खुशाल बोपचे यांनी प्रयत्न केेले.दरम्यान या विजयात मात्र भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल सहभागी झाल्याचे दिसून आले नाही. भाजपकडे सदस्य संख्या अधिक असताना भाजपने अध्यक्षपद काँग्रेसला दिल्याने सामान्य कार्यकर्त्यांनी भाजपच्या नेत्यांची चांगलीच धुलाई करीत आपल्या मनातील राग व्यक्त करीत आम्ही फक्त तुमचे झेंड उठविण्यासाठीच आहोत का ज्यांच्यासोबत गावात राजकीय वैर आम्ही करायचे आणि सत्तेसाठी तुम्ही नेते मात्र काँग्रेसच्य दावणीला बांधले जात पक्षालाही गुलाम करीत असल्यापर्यंतच्या उग्र भावना यावेळी एैकावयास मिळाल्या. 
आज झालेल्या निवडणूकीत हमिद अल्ताप अकबर अली यांनी 33 मते मिळाली. त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार राष्ट्रवादीचे गंगाधर परशुरामकर यांना 20 मते पडली.यामध्ये काँग्रेसचे 16 व भाजपची 17 मते अल्ताप यांना पडली.तर राष्ट्रवादीची 20 मते परशुरामकर यांना पडली.