गोंदिया जि.प.अध्यक्षपदी काँग्रेसच्या सीमा मडावी

0
11
गोंदिया,दि.15- गोंदिया जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी आज सोमवारी (दि.15) घेण्यात आलेल्या निवडणुकीत कॉंग्रेसच्या फुलचूर जि.प. क्षेत्राच्या सदस्या सीमा मडावी यांची वर्णी लागली आहे.त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनिता मडावी यांचा पराभव केला.अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेससोबत युती व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रयत्न करण्यात आले होते.परंतु काँग्रेसने मात्र जुनीच युती कायम ठेवत भाजपसोबत बसणे पंसत केले.भाजपने अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या रजनी कुंभरे यांचा अर्ज मागे घेत काँग्रेसच्या उमेदवाराला समर्थन देत युतीवर शिक्कामोर्तबक केले. यासाठी विशेष प्रयत्न आमदार गोपालदास अग्रवाल,लोकसभा युवक काँग्रेस नेते प्रफुल अग्रवाल यांनी केले हे विशेष.आणि भाजपचे विधानपरिषद सदस्य डाॅ.परिणय फुके यांनी ही त्यांना साथ देण्याचा निर्णय घेतल्याने यावेळी सुध्दा कमी संख्या राहूनही काँग्रेसला आपल्याकडे अध्यक्षपद ठेवण्यात यश आले.विजयानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी जल्लोष साजरा करीत आमदार गोपालदास अग्रवाल अागे बढो,काँग्रेस जिंदाबादच्या घोषणा दिल्या.मावळत्या अध्यक्ष उषा मेंढे यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष सीमा मडावी यांना कार्यालयात नेऊन त्यांना पदभार सोपविला.यावेळी सभापती पी.जी.कटरे,विमल नागपूरे,जि.प.सदस्य रमेश अंबुले,शेखर पटले,विठोबा लिल्हारे,दिपकसिंह पवार,माजी सभापती डाॅ.योगेंद्र भगत, आदी उपस्थित होते.
आज झालेल्या निवडणूकीत सौ मडावी यांनी 33 मते मिळाली. त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार राष्ट्रवादीच्या सुनीता मडावी यांनी 20 मते पडली.यामध्ये काँग्रेसचे 16 व भाजपची 17 मते सीमा मडावी यांना पडली.तर सुनिता मडावीला राष्ट्रवादीची 20 मते पडली.