माजी.आ.जैन यांच्या हस्ते ध्वजारोहण

0
8

गोंदिया,दि.26: भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ६८ वा वर्धापन दिनानिमित्त माजी आ. राजेंद्र जैन यांच्या हस्ते शहरात ठिकठिकाणी ध्वजारोहण करण्यात येणार आहे. यात, सकाळी साडेसात वाजता जिल्हा मध्यवर्ती बॅंक, सव्वाआठ शितला माता चौक, साडेआठ सुरज चौक, ८.४५ वा. सावराटोली, ९.१५ वा. गौरीनगर, ९.३0 वा. सुपर किड्स बालक मंदिर, ९.४५ वा. काली मंदिर, १0.१५ जमनालाल बजाज चौक, १0.२५ वा. फनिंद्रनाथ चौक, १0.४0 टीबीटोली पेट्रोल पंप व ११ वाजता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष कार्यालयात ध्वजारोहण करणार आहेत. यावेळी मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.