२७ ला नागरा येथे विधी सेवा महाशिबीर कार्यक्रम

0
13

गोंदिया,दि.२५ : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय, ग्रामपंचायत कार्यालय नागरा व जिल्हा वकील संघ गोंदिया यांच्या संयुक्त वतीने २७ जानेवारी रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत ग्रामपंचायत कार्यालय नागरा येथे विधी सेवा महाशिबीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कमलाकर कोठेकर हे राहतील. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एम.राजा दयानिधी उपस्थित राहणार आहेत. शिबिरात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच शासकीय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमाला नागरा व परिसरातील ग्रामस्थांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सदस्य सचिव ईशरत शेख व जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष टी.बी.कटरे यांनी केले आहे.