पाच वर्षात मनरेगाच्या कामात लाखोंचा भ्रष्टाचार

0
19

चिमूर,दि.01ः- ताल्युक्यातील नेरी वरून जवळ असलेल्या आणि मदनापूर मासळ जि. प. क्षेत्रातील ग्रामपंचायत केवाडा अंतर्गत सन २0११ ते २0१६ या पाच वर्षात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे उघडकीस आले असून या घोटाळ्याची चौकशी थंडबस्त्यात आहे. या अनुषंगाने जि. प पथकाची चौकशी कुचकामी ठरली आहे.
सविस्तर वृत्त असे की सन २0११ ते २0१६ या कालावधीत रोजगार सेवकाने गाठरोहणाचे बोगस मस्टर तयार करून बोगस मजुरांच्या नावाने २९ लाख ९६ हजार १७ रपयांची उचल करण्यात आली आहे तसेच कुशल कामाचे बनावट बिले /प्रमाणके सादर करून बांबूचे कठडे न लावताच तसेच इतर कोणत्याही प्रकारचे काम न करता ग्रामसेवक व रोजगार सेवकाने ५ लाख ७९ हजार ३५0 रु. उचल केलेली आहे. शेततलाव हे ठेका पद्धतीने मजुरांना देऊन प्रत्यक्ष काम करणार्‍या मजुरांचे काम कमी दाखवून बोगस मजुरांच्या नावाने ८0 हजार रु उचल करण्यात आली. रोजगार हमीतील इतर कामात वृक्षारोपण, पांदण रस्ते, मामा तलाव ,दूतर्फा वृक्ष लागवड इ.कामे रोजगार सेवकाने बोगस मस्टर तयार करून ४ लाख १७ हजार २५२ रु ची उचल केलेली आहे . सन २0१६ मध्ये सुरेश निकोडे ते रामभाऊ मोहूर्ले यांच्या शेतापयर्ंत पांदण रस्ता या कामावर काम करण्यार्‍या मजुरांचे काम कमी दाखवून जे कधीच मनरेगा कामावर जात नाही तसेच मागील एका वर्षांपासून बाहेर गावी राहत आहे अशा बोगस मजुरांच्या नावाने बोगस मस्टर तयार करून १ लाख ७५ हजार रुपये रोजगार सेवकाने भ्रष्टाचार केलेला आहे असे एकुण ग्रामसेवक व रोजगार सेवकाने १५ लाख ४७ हजार ६२१ रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आले आहे
या भ्रष्टाचार संबंधी तक्रार मजुरांनी व गावकर्‍यांनी १६ ऑगस्ट २0१६ ला दिलेली आहे. त्यानुसार जिल्हा परिषद पथकाडून २२ जून २0१७ व ८ ऑगस्ट २0१७ ला ग्रामपंचायत केवाडा येथे चौकशी करण्यात आली. चौकशी अंतर्गत रोजगार सेवक , ग्रामसेवक,तसेच इतर अधिकारी दोषी आढळलेले आहे. चौकशी अहवाल तयार होऊन जवळपास बराच कलावधी झाल्यानंतर सुद्धा दोषींवर शासन निर्णयानुसार कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही .
या प्रकरणात ग्रामसेवक ,सरपंच , उपसरपंच यांचे आर्थिक हितसंबंध असल्यामुळे रोजगार सेवकाला काम देत आहे. परंतु आम्हाला भ्रष्टाचारी रोजगार सेवकांच्या हाताखाली काम करावयाचे नाही तसेच रोजगार हमीतील मजुरांना न्याय देण्याकरिता चौकशी अहवालानुसार दोषींवर कार्यवाही व्हावी व नवीन रोजगार सेवकांची निवड करण्यात यावी असे निवेदन गावकर्‍यांनी गट विकास अधिकारी यांना दिले. तरी संबंधित विभागाने या प्रकरणी तातडीने पाऊले उचलून गावकर्‍यांना न्याय मिळवून द्यावा,अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा गावकर्‍यांनी दिला आहे .