विना वर्क ऑडर जि.प. प्रशासकीय इमारतीची रंगरंगोटी

0
10

गोंदिया,दि.०६: जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या रंगरंगोटीचे काम गेल्या एक-दीड महिन्यापासून सुरु आहे. या इमारतीच्या रंगरंगोटीचे वर्क ऑडर संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता अविनाश टेंभुर्णेकर यांना विचारणा केली असता इमारतीच्या रंगरंगोटीचे काम सुरु आहेत. परंतु अद्यापपर्यंत वर्क ऑडर निघालेला नाही. निविदा प्रक्रिया संदर्भात आपणास कल्पना नसल्याची माहिती बेरार टाईम्सला दिली. प्रशासकीय इमारतीच्या रंगरंगोटीसाठी पाच तुकड्यामध्ये कामाची विभागणी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. जेव्हा की, एकच प्रशासकीय इमारत असताना पाच तुकड्यात कामाचे वाटप का करण्यात आले हे कळायला मार्ग उरले नाही. प्रशासकीय इमारतीची qभतीवर दाने असल्याने वेगळ्याच प्रकारे पेंटीग करावी लागते. परंतु या ठिकाणी त्या सर्व बाबीला नजरअंदाज करण्यात आले आहे. पेंटीग करताना इमारतीची व्यवस्थीत साफसफाई सुद्धा करण्यात आलेली नाही. इमारतीवर असलेली झाडे ही जसीच्या तशीच आहेत. त्यातच जे पेटींगकचे काम सुरु आहे. त्यात प्रायमर कोट झाल्याचे दिसून येत असून वेदर कोटचा कुठेही थांगपत्ता नाही. वास्तविक वर्क ऑडर झालेला नसताना अभियंत्याने या कामाची परवानगी दिलीच कशी? हा महत्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे.