किरसान यांना जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष बनवा

0
12

देवरी,दि.07: गोंदिया जिल्हा काँग्रेस कमेटीच्या विद्यमान अध्यक्षांचा कार्यकाळ हा खूप वर्षाचा झाल्याने त्यांच्याऐवजी आदिवासी नेते व काँग्रेसचे सक्रिय पदाधिकारी नामदेवराव किरसान यांना गोंदिया जिल्हा काँग्रेस अध्यक्ष बनविण्याची मागणी देवरी, आमगाव, सालेकसा, गोरेगाव भागातील कार्यकत्र्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे. किरसान हे जिल्हा काँग्रेस कमिटीचे विद्यमान पदाधिकारी आहेत. त्यातच आदिवासी समाज काँग्रेससोबत असल्याने व आजपर्यंत आदिवासी समाजाकडे काँग्रेसने नेतृत्व दिलेले नाही. त्यामुळे किरसान यांना जिल्हा काँग्रेस अध्यक्ष बनविण्याची मागणी पुढे येऊ लागली आहे.