मुख्यमंत्री दौर्यासाठी भाजपची आढावा बैठक

0
11

अर्जुनी मोरगांव,दि.09ः- येथे  15 ते 17 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या 7 व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य सम्मेलनाच्या तयारी संदर्भात भाजपा पदाधिकारी व समन्वय समिति ची बैठक 8 फेब्रुवारी रोजी नवेगावबांंध येथील बाजार समीतीच्या कार्यालयात  घेण्यात आली. यावेळी पालकमंत्री ना. राजकुमार बडोले यांनी कार्यक्रमाच्या आयोजना संदर्भात माहिती देत या भव्य आयोजनासाठी वेगवेगळ्या कामासाठी व्यवस्थापन समिती तयार करुन नियोजनबद्ध कार्यक्रम करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांचे सहभाग आवश्यक असल्याचे सांगितले.तसेच समारोपाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत असल्याने पक्षाची मोठी ताकद दाखविण्याचे आवाहन करण्यात आले.मोठे संत, साहित्यिक व्यक्तिसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, जिल्हा महामंत्री संघटन वीरेंद्र अंजनकर यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करुन त्यांच्या सूचनांची नोंद घेतली. या वेळी मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.