कुंभीटोलाच्या सरपंच अपात्र

0
19
मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात कसूर
अर्जुनी मोरगाव,दि.08 : कुंभीटोला येथील सरपंच पदमा राठोड यांनी निवडून आल्यानंतर सहा महिन्याचे आत जातीवैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे गोंदियाच्या अप्पर जिल्हाधिकाºयांनी त्यांना सरपंच व सदस्यपदावर राहण्यास अपात्र ठरविले आहे. हा आदेश २५ जानेवारी रोजी पारित करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार राठोड ह्या जुलै २०१५ मध्ये कुंभीटोला ग्रामपंचायतसाठी प्रभाग क्रं. २ मधून नामाप्र (महिला) या जागेवरून सदस्य म्हणून निवडून आल्या. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना ६ महिन्याचे आत जात वैधता प्रमाणपत्र दाखल करण्याचे लेखी हमीपत्र लिहून दिले होते. त्यांनी जानेवारी २०१६ पर्यंत ते संबंधीत विभागाला सादर करणे आवश्यक असल्याची बाब कुंभीटोला येथील पृथ्वीराज कृष्णराव राऊत यांनी एका तक्रारीद्वारे निदर्शनास आणून दिली. राठोड यांनी नामनिर्देशन पत्र साद करतेवेळी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे केलेल्या अर्जाची पुरावा म्हणून पावती जोडलेली होती. परंतु समितीने जर वैधता प्रमाणपत्र पाठविले नसेल तर ही चूक अर्जदाराची नाही, असा युक्तिवाद राठोड यांचेवतीने अधिवक्ता अवचटे यांनी केला. मुंबई ग्रा.पं. अधिनियम १९५८ चे कलम १०-१ अ दोन अन्वये निवडून आल्याचे घोषित झालेल्या दिनांकापासून सहा महिन्याचे मुदतीत वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास कसूर केल्यास ती निवड भूतलक्षी प्रभावाने रद्द समजली जाईल, अशी अधिनियमात तरतूद आहे. याचा आधार घेत सरपंच पद््मा राठोड यांची सदस्यता भुतलक्षी प्रभावाने गोंदियाचे अप्पर जिल्हाधिकारी अशोक लटारे यांनी अपात्र घोषित केली आहे. त्यांना पदावरुन त्वरित पदमुक्त करण्याची मागणी पृथ्वीराज राऊत यांनी तहसीलदार व गटविकास अधिकाºयांकडे १ फेब्रुवारी रोजी केली आहे