26.6 C
Gondiā
Tuesday, August 18, 2026
Home विदर्भ गडकरींच्या उपस्थितीत पार पडली मनसे बैठक

गडकरींच्या उपस्थितीत पार पडली मनसे बैठक

0
34

गोंदिया,दि.२६– महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जिल्हा बैठक २५ फेब्रुवारीला महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस  हेमंत गडकरी,जिल्हाध्यक्ष मनीष चौरागडे यांच्या नेतृत्वात पार पडली.या बैठकीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची गोंदिया जिल्हा, तालुका तसेच शहर कार्यकारिणी पदाधिकारी यांना निमंत्रित करण्यात आले होते .यावेळी राज साहेबांच्या विचारांना प्रेरित होऊन तरुणांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. तसेच शहर उपाध्यक्षपदी रजत बागडे यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष मनीष चौरागडे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. माझ्या सारख्या सामान्य व्यक्ती ला माननीय राज साहेबांनी पाठबळ देऊन मोठ केले, कसलीही राजकीय पार्श्वभूमी नसतांना पक्षस्थापने पासून  राज साहेबांवर विश्वास ठेऊन मनसेचा झेंडा हाती घेतला.पक्ष वाढवला जी आज आमची ओळख आहे, ती मनसेमुळे आहे. लाट येते आणि जाते मात्र राज साहेब हे अस व्यक्तिमत्व आहे कि सत्ता असो किंवा नसो लोक आपले प्रश्न घेऊन आधी राज साहेबांकडेच जातात.यावेळी जिल्हा उपाध्यक्ष मुकेश मिश्रा, मिलन रामटेककर, सालेकसा तालुका अध्यक्ष ब्रिजभूषण बैस, गोंदिया तालुका अध्यक्ष सुरेश ठाकरे, तिरोडा तालुका अध्यक्ष खुशाल राऊत, गोंदिया शहर अध्यक्ष राजेश नागोसे , उदय पोफळी शहर उपाध्यक्ष क्षितीज वैद्य आणि इतर कार्यकर्ते उपोस्थित होते.