लोकशाहीची मूल्ये तुडवली जात आहेत- नाना पटोले

0
13

देवरी,दि. २८- गेल्या वर्षभरापूर्वी काही नेत्यांनी देवरीच्या उपविभागीय कार्यालयावर ट्रॅक्टरचालक-मालकांचा मोर्चा काढला होता. शेतकèयांचेसुद्धा मोर्चे काढले. या मोच्र्याच्या आयोजनातून या नेत्यांनी लोकांना फसवून सत्ता हस्तगत केली. साधे कपडे वापरणारी ही मंडळी आता भर उन्हातही कोट-जॅकेट वापरून फिरताना दिसतात, अशी कोपरखळी मारून केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकारद्वारे लोकशाहीची मूल्ये तुडवली जात असल्याचा आरोप माजी खासदार नाना पटोले यांनी देवरी येथे बोलताना केला.
देवरीच्या उपविभागीय कार्यालयावर गेल्या २२ तारखेला ट्रॅक्टर चालकांच्या मोच्र्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते सभेला मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी माजी आमदार रामरतन राऊत,रमेश ताराम,नामदेवराव किरसान,सहेसराम कोरेटी,शिशिर कटरे,जि.प. सदस्य उषा शहारे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्थानिक पटाच्या दाणीवरून अवैध गौणखनिज वाहतूक संदर्भात सरकारचा जाचक जीआर मागे घेण्याच्या मागणी संदर्भात ट्रॅक्टर मोच्र्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये आमगाव, सालेकसा आणि देवरी तालुक्यातील ट्रॅक्टर चालकमालक सहभागी झाले होते.
पुढे बोलताना श्री. पटोले म्हणाले की, एकीकडे सरकार सबका साथ, सबका विकास असा नारा देते. तर दुसरीकडे गरिबांना लुटत भांडवलदारांची घरे भरण्याचे काम करीत आहे. घरकुल बांधणीसाठी एक लाख ३० हजार तर देते. मात्र, दुसरीकडे १ लाख आणि जीएसटी असे १ लाख २८ हजाराचा दंड आकारते. जर रेतीसाठी एवढा दंड आकारल्या जात असेल तर १२ हजारात शौचालय आणि १ लाखात आम्ही घरे कशी बांधायची, असा प्रश्न त्यांनी यावेळी बोलताना उपस्थित केला. हा मोर्चा होऊ नये म्हणून सरकारने प्रशासनाचा गैरवापर करून दडपशाही केली. अनेक ठिकाणी मोच्र्याला परवानगी नाकारण्यात आली. ऐनवेळी मध्यस्थी केली म्हणून आज हा मोर्चा काढता आल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली. उल्लेखनीय म्हणजे याच सत्ताधारी लोकांनी यापूर्वी अनेक मोर्चे काढून तत्कालीन सरकारची बदनामी करून सत्ता मिळवली आणि सत्तेवर येताच त्यांनी जनतेला लुटण्याचे कार्य सुरू केले आहेत. देशात अनेक मोठे घोटाळे करणाèयांना संरक्षण दिले जात आहे. देशभक्तीचा टाहो फोडणारेच आता काश्मिरात आपल्या सैनिकांवर गुन्हे दाखल करीत आहेत. भगवान श्रीरामांशी बेइमानी करणाèयांचे हे सरकार आहे. पुढे बोलताना ते असेही म्हणाले की, हे अपशकुनी सरकार असून जेव्हा जेव्हा भाजपचे सरकार आले, तेव्हा तेव्हा शेतकरी अडचणीत आल्याचे ते म्हणाले.
यावेळी प्रभारी उपविभागीय अधिकारी विजय बोरुडे यांनी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या मोच्र्यात शेकडो ट्रॅक्टरसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. देवरी पोलिसांनी सुद्धा चोख बंदोबस्त लावला होता.