कंत्राटी कर्मचार्यांच्यापाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस

0
14

गोंदिया,दि. २८- कंत्राटी पद्धतीने शासकीय कामात आपली सेवा देणार्या कर्मचाèयांच्या जीवनाशी खेळ करणारा शासनादेश काढून सरकारने या कर्मचाèयावर अन्याय केला आहे. या कंत्राटी कर्मचाèयांवर शासनाने केलेल्या अन्यायाच्या विरोधात कंत्राटी कर्मचाèयांच्या मागण्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा असल्याचे पत्र तसेच निवेदन जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आले. जिल्हाधिारी यांना निवेदन देतेवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये, माजी आमदार राजेंद्र जैन, दिलीप बन्सोड, विजय शिवणकर, गंगाधर परशुरामकर, मनोहर चंद्रीकापुरे, डॉ. अविनाश काशिवार, रमेश चुèहे, लोकपाल गहाने उपस्थित होते.
निवेदनात सामान्य प्रशासन विभागाने दिनांक ९ फेबु्रवारी २०१८ रोजी काढलेल्या कंत्राटी पद्धतीने निर्माण केलेल्या पदावरील नेमणूकीच्या अटी-शर्तीबाबत तसेच या पदावर नियुक्त कर्मचाèयांच्या सेवा नियमितीबाबतचा आदेश संपूर्ण राज्यातील कंत्राटी कर्मचाèयांवर अन्याय करणारे असल्याचे म्हटले आहे.तसेच सदर शासन निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान मंगळवारला गोंदिया जिल्हा कंत्राटी कर्मचारी संघटनेने खासदार प्रफुल पटेल यांची भेट घेऊन चर्चा केली.त्यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष अतुल गजभिये, सचिव विकास कापसे,जिवनेश मिश्रा,सूर्यकांत रहमतकर, राजन चौबे, राजेश मिश्रा, नितेश खंडेलवाल, राजेश उखळकर, भागचंद रहांगडाले, त्रूप्ती साकुरे,शोभा फटींग, बाळक्रूष्ण बिसेन, मनोज सेंडमारे, नरेंद्र बोपचे, धर्मेंद्र ठाकरे, गोविंद बघेले,कैलाश खोब्रागडे, हरिणखेडे, श्रीकांत त्रिपाठी व कंत्राटी कर्मचारी संघटनेचे सदस्य यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.