23.8 C
Gondiā
Saturday, August 15, 2026
Home विदर्भ बेडगाव परिसरात नक्षलविरोधी बॅनर

बेडगाव परिसरात नक्षलविरोधी बॅनर

0
28

कोरची,दि.28ःतालुक्यातील पोलिस मदत केंद्र बेडगावअंतर्गत येत असलेल्या नाडेकल मुख्य फाट्यावर आदिवासी जिंदाबाद, नक्षलवाद मुर्दाबाद, असा मजकूर लिहिलेले नक्षलविरोधी बॅनर आढळून आल्याने सदर परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सदर बॅनमध्ये तेंदूपत्ता, बांबू ठेकेदारांमध्ये भीती निर्माण करून करोडो रुपये वसूल करण्याचा धंदा चालविला आहे, जय आदिवासी जय सेवा समिती असे लिहिण्यात आले आहे. यापूर्वी सुद्धा अशाच प्रकारचा भीतिदायक नक्षलविरोधी बॅनर याच ठिकाणी लावण्यात आला होता. त्यामध्ये शेतमजुरांची कामे, रोजगार बंद ठेवण्यास भाग का पाडता, तरुण, तरुणींना धमकावून दलमध्ये भरती होण्याचे प्रलोभन का देता, माओवादी क्रांती मुर्दाबाद! जय सेवा आदिवासी कमेटी गडचिरोली अशाप्रकारे मजूर लिहिण्यात आला होता. याबाबत बेडगावचे प्रभारी ठाणेदार दांडगे यांना विचारणा केली असता, आम्हाला याबाबत काहीही माहिती नसल्याने त्यांनी सांगितले.
सध्या बांबू कटाई, तेंदूपत्ता हंगामाची कामे जवळ येत असल्याने अशाप्रकारचे बॅनर लावून तालुक्यात दहशत पसरविण्याचे काम अज्ञात व्यक्तीकडून होत असल्याचेही परिसरातील नागरिकांतून बोलल्या जात आहे.