आरटीआय कार्यकर्त्याला बिडीओची अर्वाच्य शिवीगाळ

0
15
गोंदिया,दि.२८- माहिती अधिकार कायद्याखाली माहिती न मिळाल्याने संबंधित प्रकरणी अपील घेऊन कार्यालयात आलेल्या एका आरटीआय कार्यकर्त्याला सडक अर्जूनीचे गटविकास अधिकारी आनंद लोकरे यांनी अर्वाच्य शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. भ्रष्टाचारमुक्त शासनाची ग्वाही देणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशा मग्रूर आणि बेशिस्त अधिकाèयाला योग्य चौकशी करून वेसण घालतील काय? असा प्रश्न यानिमित्ताने जिल्ह्यात उपस्थित करण्यात येत आहे.
सविस्तर असे की, गोंदिया येथील रहिवासी असलेले आरटीआय आणि सामाजिक कार्यकर्ते सुरेश शालीकराम दुरुगकर वय ४२ यांनी सडक अर्जूनी पंचायत समिती अंतर्गत येणाèया बाल विकास प्रकल्प कार्यालयाकडे मिनी अंगणवाडी सेविका नेमणुकीच्या माहितीसाठी माहिती अधिकार कायद्याखाली अर्ज केला होता. परंतु, सदर अर्जावर कोणतीही कार्यवाही न करता अर्जदाराला ६ फेब्रुवारी २०१८ पर्यंत माहिती पुरविण्यात आली नाही. यामुळे अर्जदाराने प्रथम अपीलीय अधिकारी म्हणून पंचायत समिती सडकअर्जूनीचे गटविकास अधिकारी यांचेकडे अपिलीय अर्ज दाखल केला. यामुळे माहिती कायद्याखाली उचित कार्यवाही अपेक्षित असताना संबंधित अधिकाèयाने कोणतीही कार्यवाही केली नाही.
गेल्या २३ फेब्रुवारी २०१८ ला सायंकाळी ८.११ वाजता अर्जदार दुरुगकर हे आपल्या घरी असताना सडक अर्जूनीचे गटविकास अधिकारी आनंद लोकरे यांनी आपल्या भ्रमणध्वनीवरून ( क्र.९४०३४५४५००)अर्जदाराच्या ९१४६३९६६५० क्रमांकाच्या भ्रमनध्वनीवर फोन करून सुरेश दुरुगकर बोलत असल्याची खात्री केली. श्री लोकरे यांनी आपणाला कशासाठी माहिती पाहिजे, अशी दुरुगकर यांना विचारणा करून आपण उद्या कार्यालयात या माहिती देतो असे म्हटले. यावर दुरुगकर यांनी तसे पत्र देण्याची विनंती केली. यावर श्री लोकरे यांनी दुरुगकर यांना अर्वाच्य आणि अत्यंत घाणेरड्या शब्दात शिवीगाळ केल्याचा आरोप केला आहे.
या संदर्भात श्री दुरुगकर यांनी गटविकास अधिकारी लोकरे यांचेविरोधात गोंदिया शहर पोलिसात तक्रार दाखल केली असून लोकरे यांचेवर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. श्री दुरुगकर यांनी सर्वोच्च न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय, भारत सरकार, महाराष्ट्र शासन आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचेकडे सुद्धा आपल्या तक्रारीच्या प्रती पाठविल्या आहेत.
एकीकडे सरकार भ्रष्टाचारमुक्त शासनाचा दावा करीत असताना त्यांच्याच राज्यात नागरिकांनी अधिकारी अश्लील शिवीगाळ करीत असतील तर यापेक्षा दुसरे दुर्दैव कोणते? असा प्रश्न जनतेने विचारला असून मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी जातीने लक्ष देऊन दोषी अधिकाèयांवर कार्यवाहीची मागणी केले आहे.
दुरुगकर देतात मानसिक त्रास-लोकरे
सडक अर्जुनी पंचाङ्मत समितीचे गटविकास अधिकारी आनंद लोकरे यांना माहिती अधिकार कार्यकर्ते दुरुगकर यांनी केलेल्या आरोपाबद्दल तसेच ध्वनीफितातील त्यांच्या व्यक्तव्याबद्दल विचारणा केली असता आपण माहिती देण्यास तयार आहोत. परंतु माहिती अधिकाराच्या नावावर दुरुगकर हे कधीही कुठल्याही वेळी दुरध्वनी, भ्रमणध्वनी करुन तसेच कार्यालयात वारंवार येऊन मानसिक त्रास देत असल्याचे सांगितले.मागितलेली माहिती आपल्याशी संबंधित नसतांनाही सुट्टीच्या दिवशी बसून माहिती गोळा केली आणि ती माहिती बघून नेण्यास सांगितले. मात्र दुरुगकर हेच असभ्य भाषेचा वापर करीत ब्लॅकमेल करीत असल्याचा आरोप लोकले यांनी केला आहे.