29.1 C
Gondiā
Monday, August 10, 2026
Home विदर्भ साखरीटोला-सालेकसा बसफेरी केव्हा धावणार?

साखरीटोला-सालेकसा बसफेरी केव्हा धावणार?

0
19
सालेकसा,दि.3ः-स्वातंत्र्य मिळून देशाला ७० वर्षे लोटली, तरी शासनाच्या बèयाच योजना गावापर्यंत पोहोचल्या नाही. संगणक युगात आजही काही गावे सरकारी यंत्रणेच्या दिरंगाईमुळे बस सेवेला मुकली आहेत. याची प्रचिती सालेकसासारख्या आदिवासी नक्षलग्रस्त तालुक्यातील येत आहे.
तालुक्याला ये-जा करण्यासाठी सालेकसा गांधीटोला-सातगाव-साखरीटोला मार्गावर शासनाची आजपर्यंत एकही बस धावली नाही. त्यामुळे सदर मार्गावरील गावांच्या नागरिकांना तालुक्याला जाण्या-येण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागतो. या मार्गावर बस केव्हा धावणार? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. साखरीटोला (सातगाव) गाव देवरी-आमगाव मुख्य मार्गावर वसलेले आहे. येथे बèयाच सोयी सुविधा तसेच प्राथमिक शाळेपासून तर वरिष्ठ महाविद्यालयापर्यंत शिक्षणाच्या सोयी आहेत. त्यामुळे परिसरातील व मार्गावरील बरेच विद्यार्थी शिक्षणासाठी ये-जा करतात. परंतु, या मार्गावर एसटी पोहोचली नसल्याने बèयाच विद्याथ्र्यांना पायदळच प्रवास करावा लागतो. सन २००३ मध्ये आमगाव तालुक्यात समाविष्ट असलेली साखरीटोला, सातगाव, गांधीटोला ही गावे सालेकसा तालुक्यात समाविष्ट करण्यात आली. त्यामुळे तहसील कार्यालयाची कामे करण्यासाठी बरेचदा तालुक्याला जावे लागते. परंतु बसची सुविधा नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत.
blank