गोंदिया,दि.३ः- जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील घटेगाव येथे आरोग्य उप केंद्राचे तर खोडशिवनी येथे आरोग्य केंद्राचे उदघाटन राज्याचे आरोग्यमंत्री डा॓.दिपक सावंत यांच्या हस्ते जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखाली आज शनिवारला पार पडले.यावेळी आरोग्य विभागाचे उपसंचालक डाॅ. संजय जायस्वाल,जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर,रमेश चुर्हे,शिला चव्हाण,माधुरी पाथोडे,रचना गहाणे,माजी सभापती डाॅ.अविनाश काशिवार, अर्जुनी मोरगावचे सभापती अरविंद शिवणकर, खोडशिवनी सरपंच उर्मिला कंगाले,माजी सभापती कविता रंगारी,पोलीस पाटील भृ़गराज परशुरामकर,जि.प.सीईओ राजा दयानिधी,जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ शाम निमगडे,जिल्हा शल्य चिकीत्सक डाॅ.देवेंद्र पातुरकर,जिल्हा शिवसेना प्रमुख मुकेश शिवहरे,उपभियंता सुनिल तरोणे,तालुका वैद्यकिय अधिकारी डाॅ.ब्राम्हणकर,सडक अर्जुनीचे सभापती गिरीधर हत्तीमारे,उपसभापती राजेश कठाणे सह आदी पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.या लोकार्पण सोहळ्याकडे मात्र जिल्हा परिषद अध्यक्षांसह आरोग्य सभापती व इतर सभापतींनी पाठ फिरवली.





