29.7 C
Gondiā
Wednesday, August 5, 2026
Home विदर्भ अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलिस कर्मचारी जागीच ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलिस कर्मचारी जागीच ठार

0
24

गोंदिया,दि.०६- अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकलने जात असलेल्या पोलिस कर्मचाèयाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना ५ मार्च रोजी रात्री ७.३० वाजताच्यादरम्यान भडंगा येथे घडली. मृतक पोलिस कर्मचाèयाचे नाव गजानन रामचंद्र ठाकरे (३७) रा. विद्यानगर,भंडारा असे आहे.गोंदिया येथील पोलिस मुख्यालय कारंजा येथे पोलिस भरती संदर्भात कार्यशाळा ठेवण्यात आली. त्या कार्यशाळेसाठी देवरी येथून आला होता. कार्यशाळा संपल्यानंतर तो परत आपल्या मुख्यालयी मोटारसायकलने जात असताना भडंगा येथे अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेत त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेची नोंद गोरेगाव पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.