नक्षल्यानी फुकंले बससह 6 वाहने

0
10

सुकमा/रायपूर,दि.06ः- छत्तीसगड राज्यातील अतिसंवदेनशील असलेल्या नक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातील दोरनापाल पोलीस ठाण्यातंर्गत सोमवारच्या रात्री नक्षल्यांनी पुन्हा उत्पात माजविला असून 2 प्रवासी बससह 6 वाहनांना आग लावल्याची घटना समोर आली आहे.नक्षल्यानी दोरनापालपासून 10 किमीवरील कुर्ती जवळ दोन बस व तीन ट्रकला आग लावली सोबतच एका ग्रामीण निष्पापाची हत्या केली.या घटनेनंतर रेडअर्लट जारी करण्यात आला असून कुर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.