८५ पोलीस शिपाई पदासाठी १३५७२ उमेदवार मैदानात

0
12

गोंदिया,दि.07: राज्य पोलीस विभागाने एकाच वेळी राज्यात सर्व जिलह्यात पोलीस भरती प्रक्रिया घेण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने गोंदिया जिलह्यता ८५ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली. ३ मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात आले. दरम्यान, १३ हजार ५७२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. ७ मार्चपासून सुरु होणारी चाचणी प्रक्रिया काही कारणामुळे पुढे ढकलण्यात आली असून १२ मार्चपासून सुरु होणार आहे. भरती प्रक्रियेसाठी गोंदिया जिल्हा पोलीस विभाग सर्व व्यवस्थापनासह सज्य झाला आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी दिली.
जिलह्यात एकुण ९७ पोलीस शिपायांची पदे रिक्त आहेत. त्यातील १२ पदे अनुकंपा तत्वावर भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ८५ रिक्त पदांची सरळ भरती प्रक्रियेतून पदभरती होणार आहे. यासाठी जिल्हा पोलीस विभागाकडून ६ फेबु्रवारी रोजी वृत्तपत्रांच्या माध्यमातून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. पुर्व भरती प्रक्रिया कार्यक्रमाप्रमाणे २८ फेबु्रवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात येणार होते. मात्र राज्य पोलीस विभागाने या वेळापत्रकात बदल करुन तीन दिवस मुदतवाढ दिली. त्यामुळे ३ मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात आले. गोंदिया जिल्ह्याच्या ८५ पदांसाठी जिलह्यासह राज्यभरातून १३ हजार ५७३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. यामध्ये सर्व प्रवर्गातील २८ महिला शिपाई पदासाठी जवळपास ३५०० महिला उमेदवारांचे अर्ज आहेत.
७ मार्चपासून सुरु होणारी चाचणी प्रक्रिया आता १२ मार्चपासून सुरु होणार आहे. स्थानिक जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानात उमेदवारांच्या सर्व चाचणी प्रक्रिया होणार आहेत. यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाला आहे.
विशेष म्हणजे यंदाच्या पोलीस भरती प्रक्रियेत १६०० मीटर दौड चाचणी मुख्यालयाच्या मैदानातून होणार आहे. त्या अनुषंगाने धावपट्टी तयार करण्यात आली आहे. भरती प्रक्रियेसाठी १०० हून अधिक पोलीस अधिकारी व ४०० हून अधिक पोलीस कर्मचारी कामाला लावण्यात आले आहेत. जवळपास २६ मार्चपर्यंत चाचणी प्रक्रिया चालणार असून दरदिवशी ७०० ते ९०० उमेदवारांची चाचणी घेण्यात येणार आहे. भरती प्रक्रिया पूर्णत: पारदर्शक व्हावी यासाठी विशेष दक्षता घेण्यात आली आहे. भरती प्रक्रियेत सहभागी होणाèया सर्व अधिकारी, कर्मचाèयांना कार्यशाळेच्या माध्यमातून दिशा-निर्देश, नियम,अटी-शर्ती, निकष व त्यांचे अनुभव कथन आदी बाबींची माहिती दिली जाणर आहे. भरती प्रक्रियेत सहभागी होणाèया उमेदवारांची गैरसोय होऊ नये, यासाठी सर्व सोयी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी दिली.
उमेदवारांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था
पर जिलह्यातून किवा दुरुन येणाèया उमेदवारांची राहण्याची व जेवणाची कोंडी होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष दक्षता घेवून पोलीस मुख्यालयाजवळ पोलिसांच्या निगराणीत राहण्याची व्यवस्था तसेच सशुल्क जेवन, नाश्ता व इतर पेयपदार्थाची व्यवस्था केलेली आहे. विशेष म्हणजे प्रत्येक उमेदवाराला पोलीस प्रशासनाकडून मैदानात अल्पोहार, पाणी नि:शुल्क उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.