जागतिक महिला दिनानिमित्त महिला संमेलन

0
11
लाखनी,दि ०८:-राष्ट्रीय शिक्षण संस्था लाखनी द्वारे आयोजित विवेकानंद सार्वजनिक वाचनालय आणि राणी लक्ष्मीबाई कन्या विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त आज ८ मार्च दुपारी २ वाजता राणी लक्ष्मीबाई कन्या विद्यालयाच्या प्रांगणात महिला संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यात उद्घाटक म्हणून पोलीस उपनिरीक्षक श्रीमती प्रीती आळे, प्रमुख वक्ते सौ स्मिता गालफाडे आणि अध्यक्षस्थानी सौ डॉ अर्चना रणदिवे आणि प्रमुख पाहुणे म्हणून डॉ सोनाली भांडारकर उपस्थित राहणार आहेत. या एक दिवसीय संमेलनात आरोग्य, उद्योग आणि शिक्षण या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यासोबतच संस्थांतर्गत सेवा आणि उत्कृष्ट काम करणाऱ्या महिला कर्मचारी शिक्षिकाना स्त्री रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच समाजातील गरीब दारिद्र्य आणि विधवा महिलांना सन्मानित करण्यात येणार आहे. या संमेलनात जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित राहण्याचे आवाहन धनश्री महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा शीलाताई भांडारकर आणि कार्यक्रमाच्या संयोजिका सौ संध्या हेमणे यांनी केले आहे.