26.4 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home विदर्भ हृद्यविकाराच्या झटक्याने हवालदार ठवकर यांचे मृत्यू

हृद्यविकाराच्या झटक्याने हवालदार ठवकर यांचे मृत्यू

0
27

अर्जुनी मोरगाव,दि.09ः- तालुक्यातील केशोरी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार ज्ञानेश्वर ठवकर (वय ४५) आज दि.०९ ला दुपारी बारा वाजेच्या सुमारास ह्रदयविकाराच्या झटक्याने दुर्दवी मृत्यू झाला.हवालदार ठवकर हे पोलीस ठाणे केशोरी येथे कर्तव्यावर असताना अचानक ह्रदयविकाराच्या झटका  आल्याने त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोर येथे हलविण्यात आले.मात्र ह्रदयविकाराचा झटका हा अतिशय तीव्र असल्याने त्यांचा ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोरगावला मृत्यू झालेला होता. त्यांचा मूळ गाव पालोरा/करडी असून त्यांच्या मागे १ मुलगा १ मुलगी असून त्यांच्यावर अंत्यसंस्कार त्यांच्या स्वगावी करण्यात येणार आहे.