24.3 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home विदर्भ रानडुकराच्या हल्ल्यात महिला ठार

रानडुकराच्या हल्ल्यात महिला ठार

0
28

यवतमाळ,दि.09ः- जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यात रानडुकराच्या हल्ल्यात एक महिला ठार तर बैल जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. आज शुक्रवारला सकाळाच्या सुमारास रानडुकरच्या हल्ल्यात धुरपताबाई देवराव तुनगर(४५) रा,खेड ता दारव्हा ही महिला ठार झाली. सदर मृतक महिला गावालगतच्या नाल्यावर धुणे धुण्याकरिता गेली असता चवताळलेल्या रानडुकरच्या हल्ल्यात ती जागीच ठार झाली. तर एक बैल देखील जखमी झाला आहे.