सेंद्रिय शेती करून शेतकºयांनी समृद्ध व्हावे : काळे

0
12
गोठणगाव येथे शेतीची पाहणी
अर्जुनी मोरगाव,दि.12 : शेतकरी समृद्ध तर गाव समृद्ध व देश समृद्ध होईल. रासायनिक द्रव्यांचा शेतीपिकांवरील वारेमाप वापराने मानव व निसर्गाचा समतोल ढासळला आहे. शेतजमिनीला पोषक वातावरण, मानवाला निरोगी जीवन जगणे व अर्थसमृद्धीसाठी शेतकºयांनी सेंद्रिय शेती करावी असा मोलाचा सल्ला जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी तालुक्यातील ग्राम गोठणगाव येथील सेंद्रिय शेतीची पाहणी करताना दिला.
शनिवारी (दि.१०) सकाळी जिल्हाधिकारी काळे यांनी गोठणगाव येथील शेतकरी रतीराम राणे यांच्या शीतगृहाची पाहणी केल्यानंतर बोंडगाव सुरबन येथील प्रगतशील शेतकरी व पंचायत समिती सदस्य सुशीला योगराज हलमारे यांच्या शेडनेटला भेट दिली.
यावेळी त्यांचा मुलगा हर्षद योगराज हलमारे यांनी शेतातील व शेडनेटमधील टमाटर, वांगी, मिरची, ढोबळी मिरची, भेंडी, काकडी, टरबूज, अ‍ॅप्पल बोर तसेच १ किलो वजनाचे पेरू याबद्दल सविस्तर माहिती दिली. जिल्हाधिकाºयांनी यावेळी हलमारे कुटुंबाचे शेतीमधील अद्ययावत तंत्रज्ञान, धडपड व मेहनतीची प्रशंसा करून समाधान व्यक्त केले.
श्रृंगारबांध शेजारील शेतीतील श्रृंगार व बांधातील पक्षी न्याहाळीत सकाळीच निसर्गसौंदर्याचा आस्वाद जिल्हाधिकाºयांच्या चेहºयावर खुलून दिसत होता. प्रत्येक पिकांची काटेकोरपणे माहिती त्यांनी घेतली. हर्षद हलमारे यांनी सुद्धा शेतामधील आतापर्यंत केलेले विविध पिकांचे प्रयोग यांची दिलखुलास माहिती दिली. विशेष म्हणजे यावेळी सेंद्रिय शेती व त्यामध्ये जैविक खतांचा वापर यांच्यावरच भर दिला गेला.
जिल्हाधिकारी काळे यांनी, शासन सेंद्रिय शेतीसाठी खूप प्रोत्साहन देत असून शेतकºयांनी ते स्वीकारावे. प्रत्येक गावामध्ये सेंद्रिय शेती करण्यासाठी पुढे यावे. जमिनीची पोषकता वाढविण्यासाठी व तिचे आरोग्य सांभाळण्यासाठी रासायनिक द्रव्यांचा वापर करणे टाळावे. घरी गाई व म्हशी पाळाव्यात, त्यांना पोषक खाद्य जमिनीतून उगवावेत, त्यांचे मुत्र व शेणाद्वारे जिवामृत तयार करून सर्व पिकांवर त्याचा वापर केल्यास खत व कीटकनाशक दोघांसाठी लाभप्रद आहे. शेतजमिनीत मित्र गांडूळ तसेच उडणारे मित्र किडे यांचे संगोपन करण्यासाठी पळस व तत्सम झाडांची मोठ्या प्रमाणात लागवड करावी. शेतकरी समृद्ध तर देश समृद्ध होईल. त्यासाठी आता प्रत्येक गावातून शेतकºयांनी पुढे येऊन आपली मानसिकता सेंद्रिय शेतीकडे पुरस्कृत करावी असे त्यांनी यावेळी सांगितले.
राणेंच्या घरात रात्रीचा मुक्काम
या पाहणी दरम्यान जिल्हाधिकारी काळे यांनी रात्री गोठणगाव येथील शेतकरी रतीराम राणे यांच्या घरी शुक्रवारला मुक्काम केला. याबाबत अति गोपनीयता ठेवण्यात आली होती. अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त क्षेत्रातील मुक्काम हा दुसºया दिवशी शनिवारी परिसरात चर्चेचा विषय ठरला होता. विशेष म्हणजे यावेळी तहसीलदार पी.आर.भंडारी व कृषी विभागाचे कोहळे उपस्थित होते. यावेळी गावातील शेतकरी वगळता प्रशासनाचा लवाजमा नव्हता. अत्यंत गोपनीय दौरा ठेवण्यात आला होता. परंतु यांची माहिती विशेष कुणाला नव्हती, अत्यंत साधेपणाची राहणी यावेळी जिल्हाधिकाºयांनी दर्शवून बिसलेरीचे पाणी नाकारून घरातील पाणी पिण्यासाठी वापर केल्याचे व अस्सल हाडामासाच्या शेतकºयाचे दर्शन घडल्याचे राणे म्हणाले. अधिकाºयांचा अविर्भाव जिल्हाधिकाºयांच्या मुक्कामी आढळला नसल्याने राणे कुटुंबाने समाधान व्यक्त केला.