सिहोऱ्यात शेकडो लिटर दूध ओतले रस्त्यावर

0
16

तुमसर, दि.१९:-: दूध शितकरण गृहात तांत्रीक बिघाड आल्याचे कारण देत दुध संघाने रविवारी जिल्ह्यातील दुध खरेदीस नकार दिल्याने शेकडो लिटर दुध रस्त्यावर प्रवाहित करण्यात आले. तुमसर तालुक्यातील सिहोरा येथे सदर पशुपालकांनी जिल्हा दुध संघाचा निषेध नोंदविला.
शेतीला पुरक व्यवसाय म्हणून सिहोरा परिसरासह जिल्हयात हजारो शेतकरी पशुपालन व दुग्ध व्यवसाय करतात. दुष्काळी परिस्थितीत हाच व्यवसाय शेतकºयांना आधार देतो. येथील शेतकºयांनी कर्ज घेवून गायी, म्हशी घेतले आहे. यावर्षी धान शेतीने धोका दिला. रब्बी पीकही अवकाळी पावसाच्या फटक्याने होण्याचे नव्हते झाले. अशा स्थितीत शेतकºयांना दुध व्यवसाय आधार देत आहे. यातूनच बहुतांश शेतकरी कुटूंबाचा रथ हाकत आहेत.
यापूर्वी शासनाने दुधाचे भाव कमी केले. यातच पशु खाद्याचे वाढते दर शेकºयांची चिंता वाढविणारे आहे. आणि आता दुध संघानेही शेतकºयांच्या चिंतेत भर घातली आहे. महिना-पंधरा दिवसातून एक-दोन दिवस दुध खरेदी बंद ठेवली जाते. विशेष म्हणजे शेतकºयांना खरेदी बंद असल्याची कोणतीच पुर्व सूचना दिली जात नाही. रविवारलाही असेच झाले.
ग्रामीण भागातील अनेक शेतकºयांनी सिहोरा येथील पाच दुग्ध डेअरी मध्ये सकाळी दुध घेऊ न आले. मात्र दुध डेअरी संचालकांनी वेळेवरच दुध खरेदी बंद असल्याचे सांगितले. यामुळे शेतकरी संतप्त झाले. यावेळी अनेक शेतकºयांनी दुध रस्त्यावर ओतून दिले.