लाखनी तालुका काँग्रेस कमिटीची बैठक

0
10

लाखनी,दि.27 : तालुका व शहर काँग्रेस अध्यक्ष तसेच विधानसभा व तालुका, शहर समन्वयकांची बैठक कांँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
बैठकीला जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रेमसागर गणवीर, जिया पटेल, धनंजय तिरपुडे, सुनिल गिºहेपुंजे, महेंद्र निंबार्ते, मुकुंद साखरकर, जिल्हा परिषद सदस्य पंधरे, जिल्हा परिषद सदस्य आकाश कोरे, ज्ञानेश्वर रहांगडाले, पं.स. सभापती दादु खोब्रागडे, उपसभापती धनशाम देशमुख, उल्हास भालेराव, यशवंत खेडीकर, प्रदिप तितिरमारे, पं.स. सदस्य पंकज शामकुवर, पं.स. सदस्य विजय कापसे, खुशाल गिदमारे, आत्राम, पटले, दत्ता गिहेपुंजे, उमराव आठवले, जयकृष्ण फेंडरकर, अनिल निर्वाण, वरकड, मोहन निर्वाण, भोला ऊके, निखिल सिंगनजुडे, विकास वासनिक, परवेज आकबानी, मंगेश धांडे, संजय बागडे सावरी, रघुनाथ आत्राम, रामु अंबादे प्रामुख्याने उपस्थित होते.
पोटनिवडणुका लक्षात घेता जिल्ह्यातील विविध तालुक्यात प्रदेश काँग्रेस कमिटीकडून चरणबद्ध कार्यक्रमानुसार बूथ नियोजन कार्यक्रम जिल्हा व तालुका काँग्रेस समन्वयाने क्रियान्वित पंचायत समिती सर्कल निहाय, प्रभाग निहाय, बूथ निहाय, समन्वयककरीता योग्य कार्यक्रमाची निवड करून मतदार याद्या अंतर्गत पाच प्रमुखांची नियुक्ती तात्काळ करण्याचे निर्देश नाना पटोले यांनी दिले.