शिवसेनेच्या प्रयत्नाला यश तुमसर-नागपूर शिवशाही बससेवा सुरू

0
8

तुमसर,दि.28ः-तुमसर आगारातून ‘शिवशाही’ बस सुरू करावी, याकरिता परिवहन विभागाचे अधिकारी भालेराव यांना शिवसेनेतर्फे निवेदन देण्यात आले होते. खाजगी वाहतुकदाराकडून जास्त दरात प्रवाशांना प्रवास करावा लागत होता. त्यावर तोडगा म्हणून शासनाने परिवहन महामंडळातर्फे सर्व सुविधायुक्त अशी वातानुकूलीत शिवशाही बससेवा तुमसर- नागपूर-तुमसर सुरू करण्यात आली असून प्रवाशांना आरामदायी प्रवास करता येणार आहे. शिवशाही वातानुकूलित बससेवा तुमसर येथून सुरू व्हावी यासाठी शिवसेना जिल्हा प्रमुख इंजी. राजेन्द्र पटले यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना सतत पाठपूरावा केला होता. म्हणून शुक्रवारला शिवशाही बससेवेचा शुभारंभ तुमसर एस. टी. आगारातून करण्यात आला. शिवशाही बससेवेमुळे केवळ दीड तासात तुमसर ते नागपूर दरम्यानचा प्रवास होणार असून ही बस विना वाहक असणार आहे. या बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा, वायफाय व वातानुकूल सेवा असून आरामदायी सुख सुविधा अंतभरुत आहेत. भविष्यात या सेवेकडे प्रवाशांचे प्रमाण वाढणार आहे. सदर शिवशाही बसेसची कमी असल्यामुळे बस सेवा सुरू करण्यास विलंब झाला असे परिवहन विभागाचे अधिकारी यांनी सांगितले