24.8 C
Gondiā
Saturday, August 8, 2026
Home विदर्भ आज गोंदिया येथे सर्वधर्मीय सामुहिक विवाह सोहळा

आज गोंदिया येथे सर्वधर्मीय सामुहिक विवाह सोहळा

0
35

गोंदिया,दि.११ : जिल्हास्तरीय सर्वधर्मीय सामुहिक विवाह सोहळा समिती गोंदियाच्या वतीने १२ मे रोजी सकाळी ९ वाजता जे.एम.हायस्कूल पुनाटोली गोंदिया येथे सर्वधर्मीय सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. प्रमुख पाहूणे म्हणून नागपूरच्या धर्मदाय सहआयुक्त श्रीमती ए.एस.कोल्हे, गोंदियाच्या सहायक धर्मदाय आयुक्त निलीमा मालोदे, श्रीमती सई काळे, श्रीमती मृदला वालस्कर, सौ.निलीमा भुजबळ, राजेंद्र जैन, समीर बैस, सय्यद अफजल शाह यांची उपस्थिती राहणार आहे. या विवाह सोहळ्यात ११ विविध जाती धर्माचे जोडपे विवाहबध्द होणार आहे. सामुहिक विवाह सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी उत्तम नंदेश्वर, सय्यद अस्लम अली, डॉ.चरणसिंग जुनेजा, रमेश ताराम, ॲड.टी.बी.कटरे, संगीता घोष, कृष्णकुमार हयगये, ॲड.सीमा शेंडे, डॉ.सविता बेदरकर, डॉ.नीरज कटकवार, राजेंद्र मिश्रा, मधुकर कावळे, ॲड.अशोक बोरकर, ओंकार लिल्हारे, पुजा तिवारी, मनोज भांडारकर, इरफान काजी, संजय मेश्राम, सुब्रत पाल, रुपचंद जांभुळकर, निखील जैन परिश्रम घेत आहे.