तीन जहाल नक्षल्यांनी केले आत्मसमर्पण

0
10

गडचिरोली,दि.24 : गडचिरोली जिल्हयासह शेजारील विविध घटनामंध्ये ८ लाख रूपयांचे बक्षिस असलेल्या ३ जहाल नक्षल्यांनी  पोलिस अधीक्षक डाॅ. अभिनव देशमुख, अपर पोलिस अधीक्षक डाॅ. महेश्वर रेड्डी, राजा आर. यांच्या समक्ष  आत्मसमर्पण केले.
रजिता उर्फ सिरोती माधुराम कुरचामी (२६) , जितेंद्र उर्फ परदेशी बाजीराव पदा (२१) व तिरूपती उर्फ पेंटा सुरा वेलादी (२०)  अशी आत्मसमर्पीत नक्षल्यांची नावे आहेत.
रजिता ही एप्रिल २०१० ला टिपागड दलममध्ये भरती झाली. आॅगस्ट २०११ पासून २०१५ पर्यंत चातगाव दलममध्ये कार्यरत होती. तिचा एकूण ६ पोलिस – नक्षलींमध्ये सहभाग होता. तसेच २ खून, १ जाळपोळ केल्याचे गुन्हे दाखल आहेत. तिच्यावर शासनाने २ लाखांचे बक्षिस जाहिर केले होते.
जितेंद्र उर्फ परदेशी बाजीराव पदा हा २०१७ मध्ये टिपागड दलममध्ये भरती झाला. २०१८ पर्यंत दलम सदस्य म्हणून कार्यरत होता. शासनाने त्याच्यावर दोन लाखांचे बक्षिस जाहिर केले होते.तिरूपती उर्फ पेंटा सुरा वेलादी हा जून २०१६ मध्ये अहेरी दलममध्ये भरती झाला. आॅक्टोबर २०१७ पासून मे २०१८ पर्यंत कंपनी क्रमांक १० च्या सदस्य पदावर कार्यरत होता. त्याचा एका पोलिस – नक्षल चकमकीत सहभाग आहे. शासनाने त्याच्यावर चार लाखांचे बक्षिस जाहिर केले होते.