बारा बलुतेदार महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी चन्ने

0
25
गोंदिया,दि.06 : बारा बलुतेदार महासंघाच्या गोंदिया जिल्हाध्यक्ष अशोक चन्ने यांची निवड करण्यात आली. महासंघाचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव दळे यांनी अशोक चन्ने यांची निवड केली असून त्यासंबधीचे नियुक्ती पत्र त्यांना देण्यात आले आहे. अशोक चन्ने यांनी नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी पार पाडली. सध्या ते महामंडळाचे प्रांत उपाध्यक्ष असून फुलचूर ग्राम पंचायतीचे उपसरपंचही राहिले आहेत. त्यांच्या सक्रीय व उत्कृष्ट कार्याची दखल घेत बारा बलुतेदार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव दळे यांनी बारा बलुतेदार  महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी अशोक चन्ने यांची नियुक्ती केली आहे. अशोक चन्ने यांच्या निवडीबद्दल महेश उरकुडे, दिनेश फुलबांधे, कलीम भाई, अजित मेश्राम, बबलु उरकुडे, दिपक कुंभलवार, सेवकराम बन्सोड, श्रीराम भुजाडे, सुरेश चन्ने, शिवनारायण नागपुरे, राजेश चतुर यांच्यासह नाभिक महामंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.