गोंदिया,दि.7 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ५ जून रोजी केंद्र शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री आवास योजना (शहरी)च्या लाभार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. प्रधानमंत्री मोदी यांचा संवाद कार्यक्रम ऐकण्यासाठी जिल्हाधिकारी यांचे कक्षात जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एम.राजा दयानिधी, संबंधित नगरपालिकांचे मुख्याधिकारी, प्रशासन अधिकारी तसेच गोंदिया आणि तिरोडा नगरपालिका क्षेत्रातील लाभार्थी उपस्थित होते.
यावेळी प्रधानमंत्री मोदी यांनी या योजनेतील अडचणी विषयी माहिती व हक्काचे घरकूल मिळत असल्याबाबतच्या भावना लाभार्थ्यांकडून जाणून घेतल्या. गोंदिया नगरपालिका क्षेत्रातील लाभार्थी पंकज पांडे, विद्या गौतम, जितेश उजवणे, अमृता गणवीर, अनिता मेर्शाम, गुणवंता कंसारी, गोरेगाव येथील ताराबाई पुराम, छोटी सय्यद, तिरोडा येथील दिपक बंधाते, शिला बंसोड, चित्रकला पटले, जयवंता टेकाम, अजुर्नी/मोरगाव येथील सुरेश तांडेकर, गरीबदास वासनिक, मिराबाई उईके, देवरी येथील हमिता अंबादे व निर्मला कुंजाम यांची उपस्थिती होती. उपस्थितांना जिल्हाधिकार्यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.





