24.8 C
Gondiā
Monday, August 10, 2026
Home विदर्भ वीज पडून तीन मेंढपाळ गंभीर जखमी

वीज पडून तीन मेंढपाळ गंभीर जखमी

0
24

यवतमाळ, दि.७:: तालुक्यातील ब्रम्ही येथील शिवारात झाडाखाली बसलेल्या मेंढपाळांवर वीज कोसळून तिघे गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवारी (दि.6) रात्री नऊच्या सुमारास झाली. जखमींना येथे प्राथमिक उपचार करून यवतमाळ येथे हलविण्यात आले आहे.बंडू रामू नेमाले, बालू ज्योतीराज टिले व सुभाष बालू टिले असे वीज कोसळून जखमी झालेल्यांची नावे आहेत.नेर तालुक्यातील दगडधानोरा भागात धनगर बांधवांनी आपल्या मेंढ्या बसवल्या होत्या. एका झाडाखाली चौघे बसून होते. मेंढ्यांचे ठाण बाजूलाच होते. मात्र, रात्री नऊच्या सुमारास वादळवार्‍यासह पाऊस सुरू झाला, त्यातच वीज झाडावर कोसळून त्याखाली बसलेले चौघेही जखमी झाले. त्यापैकी एकाला कमी धक्का बसला. परंतु, बंडू रामू नेमाले, बालू ज्योतीराज टिले व सुभाष बालू टिले हे तिघे गंभीर जखमी झाले.काही समाजबांधवांनी जखमींना नेर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.