अभियांत्रिकी पदवीच्या 8500 जागा कमी

0
14

मुंबई दि.७:- राज्यातील अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटीच्या निकालानंतर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशाची प्रक्रिया आजपासून (दि.७:) सुरू होणार आहे. दर वर्षी नवीन महाविद्यालये, तुकड्यांना मंजुरी दिली जाते. त्यामुळे प्रवेशाच्या जागांमध्ये भर पडते; मात्र या वर्षी 19 जुन्या महाविद्यालयांना मान्यता न मिळाल्याने प्रवेशाच्या 8500 जागा कमी झाल्या आहेत.

अभियांत्रिकी महाविद्यालयांना अभ्यासक्रमांसाठी एआयसीटीईकडून मान्यता घ्यावी लागते. अपुरे विद्यार्थी, सुविधांची कमतरता यामुळे 19 महाविद्यालये मान्यतेसाठी पुढेच आली नाहीत. गतवर्षी अभियांत्रिकीच्या 56,940 जागा रिक्‍त राहिल्या होत्या. या वर्षी 347 महाविद्यालयांत विविध अभ्यासक्रमांच्या 1,29,702 जागा आहेत. चार वर्षांपासून रिक्‍त जागांची संख्या वर्षानुवर्षे वाढतच आहे. अभियांत्रिकीकडे विद्यार्थी पाठ फिरवत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे खासगी संस्थाचालकांचा महाविद्यालये बंद करण्याकडे कल वाढला आहे. एआयसीटीईने एनबीए प्रमाणपत्र, महाविद्यालयातील पायाभूत सुविधा याबाबत अनेक बंधने आहेत. यापूर्वी केवळ पैसा कमावण्याच्या उद्देशाने अनेक महाविद्यालयांनी जागा भरमसाट वाढवल्या; पण त्या भरल्या जात नसल्याने महाविद्यालयांना फटका बसत आहे. त्यामुळे या वर्षी जागा कमी झाल्या आहेत.

आजपासून प्रवेश प्रक्रिया 
– 7 ते 19 जून – प्रवेश अर्ज भरण्याची मुदत
– 21 जून – गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल
– 24 जून – पहिला कॅप राऊंड
– 25 ते 28 जून – पर्यायी अर्जाची मुदत