26.1 C
Gondiā
Wednesday, August 12, 2026
Home विदर्भ रोहणा येथे वीज पडून बैल, म्हैस ठार

रोहणा येथे वीज पडून बैल, म्हैस ठार

0
77

मोहाडी,दि.09ः-तालुक्यातील रोहणा येथे वीज पडून बैल व म्हैस ठार झाल्याची घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली. रात्री ८ वाजतापासून रोहणा परिसरात विजेच्या कडकडाटासह पाऊस आणि वादळवार्‍याला सुरुवात झाली. त्यावेळी पुरुषोत्तम पंचबुद्धे यांच्या शेतात काही जनावरे मंडपामध्ये बांधलेले होते. तर म्हैस आणि बैल हे कडुनिंबाच्या झाडाखाली बांधले होते. वादळवारा सुरू असताना अचानक म्हैस व बैलांवर वीज कोसळली. त्यात दोन्ही जनावरांचा मृत्यू झाला. विजेचा प्रभाव इतका होता की कडुनिंबाचे झाड मधातून पूर्णत: चिरल्या गेले. पंचबुद्धे हे सकाळी शेतावर दूध काढण्यासाठी गेले असता त्यांना दोन्ही जनावरे मृतावस्थेत आढळून आले. यात त्यांचे १ लाख १0 हजारांचे नुकसान झाले आहे. घटनेचा पंचनामा करण्यात आला असून नुकसानग्रस्त शेतकर्‍याला भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.

blank