चौपाल वायफायच्या माध्यमातून तुमसरच्या ग्रामस्थांनी साधला केंद्रीय मंत्र्यांशी सवांद

0
5

गोंदिया,दि.११ः- जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यांतर्गत येणाèया तुमसर येथील ग्रामस्थांशी आज ११ जून रोजी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद व रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी वायफाय चौपाल कार्यक्रमातंर्गत संवाद साधला.गोरेगाव तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतीमध्ये वायफायसुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.त्यामुळे ग्रामस्थांना ग्रामपंचायत कार्यालयात बसून व्हिडीओकॉन्फरंसद्वारे आपल्या समस्या मांडण्याची संधी मिळाली आहे.आज ११ जून रोजी महाराष्ट्रातील ५ ग्रामपंचायतीची या चौपाल कार्यक्रमासाठी निवड करण्यात आली होती.त्यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील तुमसर ग्रामपंचायतीचा समावेश होता.सकाळी १०.३० वाजता या वायफाय चौफाल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.माहिती व प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सरपंच सरिता चौधरी यांच्यासह उपस्थित नागरिकांसोबत शासनाच्यावतीने उपलब्ध करुन दिल्या जात असलेल्या शासकीय योजनाबद्दल माहिती दिली.तसेय वायफायसेवेबद्दल माहिती देत यामाध्यमातूनच जिल्हा व तालुकास्तरावर आपल्या समस्या गावातूनच वरिष्ठ अधिकाèयांपर्यंत पोचविता येतील असे सांगितले.तसेच रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी रेल्वेच्या सर्वप्रकारच्या तिकीटा ऑनलाईन मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिल्या असल्याची माहिती दिली.या कार्यक्रमाचे आयोजन गोंदिया जिल्हा सीएसटी विभागाच्यावतीने करण्यात आले होते.