डॉक्टरावरील हल्ल्याचा निषेध; संघटनेचे निवेदन

0
11

साकोली,दि.20ः-येथील डॉक्टर नितीन गुप्ता यांच्यावर शुक्रवारी रात्री १0.३0 वाजताच्या सुमारास हल्ला झाला. अज्ञात इसमांनी दगडफेक केल्याने वाहनाच्या काचा फुटून डॉ. गुप्ता जखमी झाले. या घटनेचा निषेध करीत अज्ञात इसमांना तात्काळ अटक करण्यात यावी, या मागणीकरिता डॉक्टर असोसिएशन संघटनेतर्फे उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.
हल्लेखोरांना ताबडतोब अटक करून फौजदारी कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना संघटनेचे साकोली शाखा अध्यक्ष डॉ. हेमकृष्ण कापगते, डॉ. रुपेश बडवाईक, डॉ अजय तुमसरे, डॉ. चंद्रशेखर मेर्शाम, डॉ. भाष्कर कापगते, डॉ. ओमेंद्र येळे, डॉ. नितीन गुप्ता, डॉ. राजेश चंदवानी, डॉ. चंद्रकांत निंबार्ते व अन्य डॉक्टरांचा समावेश होता.