32.1 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ मोदींच्या प्रयत्नाने आमदार निधीतून सौन्दड़ येथे चार हातपंप

मोदींच्या प्रयत्नाने आमदार निधीतून सौन्दड़ येथे चार हातपंप

0
24

blank

सडक अर्जुनी ,दि.27 :- तालुक्यातील सौन्दड़ ग्राम पंचायत अंतर्गतक असलेल्या वॉर्डात मतदारसंघाचे आमदार व पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या आमदार निधीतून चार विंधन विहिरीचे काम गांधी वॉर्डात करण्यात आले आहे. सौन्दड़चे ग्रामपंचायत सदस्य हर्षकुमार विनोदकुमार मोदी यांनी ना.बडोले यांना गावकऱ्यांच्या मागणीनुसार गावातील विविध वॉर्डात विंधन विहिर बांधकामाकरीता निवेदन दिले होते.त्यानुसार चार विंधन विहिरीचे काम आमदार निधीतून होत असून 26 जुर्ले रोजी भूमीपूजन करण्यात आले. मदन साखरे, शंकर खेकरे, मंगेश मोदी ,सुखदेव श्रीसागर, मंजुताई डोंगरवार प.स.सदस्य, दिव्याताई बनकर,वर्षाताई शहारे ग्रा.प.सदस्य, निंबेकरताई ग्रा.प.सदस्य, ओंकार इरले ग्रा .प .सदस्य, सुक्कल निर्वाण, भुमेश्वर शिवणकर आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

blank