गोंदियातही मराठा समाज उतरला रस्त्यावर

0
9

गोंदिया,दि.31 : मराठा समाजाला आरक्षण लागू करण्याच्या मागणीला घेऊन राज्यात सर्वत्र सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद जिल्ह्यातही उमटले. आरक्षणासाठी येथील मराठा समाजबांधवानी एकत्र येवून सोमवारी (दि.३०) शहरात मोर्चा व मोटारसायकल रॅली काढून आरक्षणाची मागणी रेटून धरली. पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे देऊन उपविभागीय अधिकाºयांमार्फत मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन देण्यात आले.
मराठा आरक्षणासाठी राज्यात मराठा आंदोलन तीव्र होऊन ते चिघळत चालले आहे. या आंदोलनात येथील मराठा समाजानेही उडी घेतली. सोमवारी (दि.३०) येथील मराठा समाजबांधवांनी आंबेडकर चौकातील पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे दिले. त्यानंतर आंबेडकर चौक ते उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांना निवेदन देण्यात आले. या वेळी दीपक कदम, पंकज सावंत, प्रतीक कदम, पवन शिंदे, रमेश दलदले, दत्ता सावंत, मोहन काळे, महेंद्र तुपकर, विवेक जगताप, चंद्रकांत सनस, राजू तुपकर, होमेंद्र तुपकर, विजय माने, महेंद्र बढे, सुशिल केकत, महेंद्र माने, मुरलीधर पवार, अल्का सुरसे, भावना कदम, प्रिया सावंत, ज्योती सुरसे, माया सुरसे, सीमा बढे, आरती सावंत, जयश्री तुपकर, प्रकाश कदम, पराग कदम, आशिष जुनघरे, अजय जाधव, गीता लिमसे यांच्यासह मोठ्या संख्येने मराठा समाजबांधव उपस्थित होते.