महिलांना गॅस कनेक्शनचे वितरण

0
8

अजुर्नी मोरगाव,दि.31ः- तालुक्यातील दाभना (अरततोडी) येथे इंडियन गॅस एजन्सीच्या वतीने परिसरातील महिलांना गॅस कनेक्शन वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच दिपक रहेले होते. प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार धनंजय देशमुख, गटविकास अधिकारी नारायण जमाईवार, उपसरपंच चरण घासले, एलपीजीचे अशोक चांडक, पोलिस पाटील सुनंदाबाई शिवणकर, ग्रामविकास अधिकारी सी.जी. बागडे व सर्व ग्राम पंचायत सदस्य, गावकरी उपस्थित होते.
दाभना गावात प्रधानमंत्री उज्जवला गॅस योजनेतंर्गत ७0 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यामुळे अर्जुनी मोरगाव इंण्डेण गॅस एजन्सीच्या माध्यमातून लाभार्थ्यांना गॅस कनेक्शन वाटप करण्यात आले. यावेळी बीडीओ जमईवार यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती विशद करून प्रत्येक नागरीकांनी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचालन स.शि.निखारे यांनी तर आभार सी.जी.बागडे यांनी केले. कार्यक्रमाला गावकर्‍यांची मोठय़ा संख्येत उपस्थिती होती.