मोहम्मद रफी यांची पुण्यतिथी साजरी

0
30

गोंदिया,दि.02ः- येथील शरणागत संगीत विद्यालयात ३१ जुलै रोजी मोहम्मद रफी यांची पुण्यतिथी साजरी करून त्यांना र्शद्धांजली वाहन्यात आली. यावेळी त्यांच्या आठवणीत त्यांचे गायलेले सुमधुर गीत सादर करण्यात आले.
मोहम्मद रफी यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या वेळी संगीत विद्यालयाचे संचालक विनोद शरणागत यांनी त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. याप्रसंगी आयोजित संगीत कार्यक्रमात राजू सोनी यांनी आज मौसम बडा बेईमान है, अशोक राठौड. यांनी चाहूँगा मैं तुझे सांझ सबेरे, विनोद शरणागत यांनी तुम मुझे यूँ भूला न पाओंगे, चाहे कोई मुझे जंगली कहे,तेरी आँखों के सिवा, उदयन निगुडकर यांनी मधुबन में राधिका नाची रे, अतुल सतदेवे आने से उसके आये बहार, हैरी फ्रांसीस, मुजीब खान व खुशाल भोयर यांनी देखील गीत सादर करुन श्रोत्यांची मने जिंकली व श्रद्धांजली वाहिली.
कार्यक्रमात वादन कार्यात राजेन्द्र कनोजिया, गौरव दीप, मुजीब खान, आशीष देशभरतार, राधेश्याम चौधरी, राहुल दीप व केदार शरणागत यांनी साथ दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशांत मेर्शाम, देवराज सोनी, प्रमोद शरणागत यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार प्रदीप गजभिये यांनी मानले.