आरमोरीत आरक्षणाबाबत ओबीसी आक्रमक

0
9

आरमोरी,दि.02ः- गडचिरोली जिल्ह्यातील ५0 टक्क्याहून अधिक ओबीसी समाजाला पाहिजे त्याप्रमाणात आरक्षण देण्यात आलेले नाही. केंद्रात २७ टक्के आरक्षण असताना गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींना १९ टक्के आरक्षण देण्यात आले होते. परंतु आजच्या परिस्थितीत ते फक्त ६ टक्क्यांवर आणण्यात आले आहे. याचा राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाने निषेध करून ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन तहसीलदारांना दिले.
ओबीसी प्रवर्गात सुमारे ५00 पेक्षाही जास्त जाती व पोटजातींचा समावेश आहे. ६ टक्के आरक्षण म्हणजे अतिशय अल्प प्रमाणात असून ओबीसी समाजावर अन्याय करणारे आहे. सध्या नोकरभरती प्रक्रियेत या समाजाला एकही जागा वाट्याला येत नसल्यामुळे युवा पिढी सुशिक्षित बेरोजगारांच्या संख्येत वाढ होत आहे. यामुळे समाजाची आर्थिक व शैक्षणिक प्रगती खालावत चालली आहे. त्यामुळे या परिस्थितीचा निषेध करण्यात आला.
निवेदन देताना चेतन भोयर, मनिष राऊत, अक्षय बोरकर, मंजुषा दोनाडकर, विकेश नैताम, मिथून शेबे, निशिकांत नैताम, प्रदिप ठेंगरी, प्रविण ठेंगरी, रामहरी राऊत, नखाते, मिलींद खोब्रागडे, पुष्पा दिवटे, नक्षिता ढोरे, चंदा बिडवाईकर, रार्जशी राऊत, अमोल ढोंगे, रिंकू झरकर, रूपेश फुलबांधे, वैभव कुथे, मनोज पांचलवार, देवा चापले, पंकज चापले, रोहित बावणे, मंगलदास पिलारे, सचिन धोटे, विक्की बोरकर, आर्यन पिलारे, राकेश खरकाटे, सुनिल ढोंगे, सचिन कुथे, निकेश फुलबांधे, प्रविण सेलोकर, स्वप्नील ढोरे, सुबोध भेंडारकर, दीप भेंडारकर, तेजस दोनाडकर, मंगेश सरकार, गिरीष करंबे उपस्थित होते