‘डीबीटी योजने’विरोधात आदिवासी विद्यार्थ्यांचे ६ ऑगस्टला ठिय्या आंदोलन

0
10

नागपूर,दि.02 : शासनाने मागील काही महिन्यांपासून आदिवासी वसतिगृहांसाठी खाणावळ बंद करून त्याऐवजी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात रोख रक्कम जमा करण्याचा (डीबीटी) निर्णय घेतला. याविरोधात आदिवासी विद्यार्थ्यांनी राज्यभर आंदोलन केले. हे आंदोलन आता तीव्र होणार असून ६ ऑगस्ट रोजी राज्यव्यापी ठिय्या आंदोलन पुकारण्यात आले आहे. आदिवासी विभागाने ५ एप्रिल रोजी यासंदर्भात शासन निर्णय जारी केला. त्यानंतर याविरुद्ध संपूर्ण राज्यभरातून निषेध नोंदविण्यात येत आहे. थेट लाभ हस्तांतरणाचा निर्णय विद्यार्थी हिताचा नसून आदिवासींना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा हा प्रकार असल्याचे मत व्यक्त होत आहे. जीआरनुसार, विद्यार्थ्यांना भोजनाची सुविधा उपलब्ध करून न देता त्याऐवजी महिन्याकाठी ३ हजार ते ३ हजार ५०० रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये विभागीय, जिल्हा, तालुकास्तरावरील वसतिगृहांचा समावेश आहे. सरकारच्या या धोरणामुळे जंगल, दऱ्याखोऱ्यांतून आलेले आदिवासी विद्यार्थी वसतिगृहाच्या सवलतीपासून वंचित राहतील व विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ येईल. कोणत्याही खानावळीत एक वेळच्या जेवणाचा दर चहा व नाश्ता सोडून दोनशे ते तीनशे रुपये थाळीएवढा आहे. याचाच अर्थ एका दिवसात पाचशे रुपये जेवणाचा खर्च येतो. .