अखेर आमगाव खुर्द सालेकसा नगर पंचायत मध्ये समाविष्ट

0
13

सालेकसा,दि.10ःः सालेकसा तालुक्यातील एकमेव नगर पंचायत असलेली सालेकसा नगर पंचायत स्थापनेपासूनच वडाच्या भोवऱ्यात सापडली होती, मात्र आता हा वाद कायमस्वरूपी संपला असून आमगाव खुर्द ग्राम पंचायताईचे समावेश सालेकसा नगर पंचायत मध्ये झाले. ८ आगस्ट रोजी झालेल्या शासन निर्णयानुसार आमगाव खुर्द ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या सर्व बाबींचा समावेश सालेकसा नगर पंचायत मध्ये करण्यात आला असून आमगाव खुर्द गावचे सर्व कारभार आता सालेकसा नगर पंचायत मधून होणार आहेत. सालेकसा नावाने असणारे सर्व शासकीय कार्यालय जसे रेल्वे स्थानक, बस स्थानक, पोलीस स्थानक, बाजारपेठ, पोस्ट ऑफिस, तहसील कार्यालय, पंचायत समिती, तालुका कृषी कार्यालय, शाळा महाविद्यालय व इतर
शासकीय व निमशासकीय कार्यालये ही आमगाव खुर्द ग्राम पंचायतीच्या हद्दीत असल्याने आमगाव ग्राम पंचायतीला सालेकसा नगर पंचायत मध्ये समावेश करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. त्यासाठी शासनाचे आदेश असून सुद्धा राजकीय दबावाखाली विलीनीकरण होत नाही हे बघून गावकऱ्यांनी न्यायालयाचे दार ठोठावले. ब्रजभूषण बैस, वासुदेव चुटे ह्यांनी जनहित याचिका सादर करत ग्राम पंचायतीला नगर पंचायत मध्ये समाविष्ट करा अशी मागणी केली होती. न्यायालयाच्या विलीनीकरण धोरणाला न जुमानता कित्तेक वेळेस ग्राम पंचायतीचे निवडणूक तर नगर पंचायतीची निवडणूक लागली. त्यावर वेळोवेळी बहिष्काराचे हत्यार वापरून ग्रामस्थांनी विरोध दर्शविला. लोकप्रतिनिधींना गावबंदी सुद्धा घालण्यात आली होती. आमरण उपोषण साखळी उपोषण असे विविध मार्गाने विरोध करत प्रशासनाला दणाणून सोडत कित्तेक केसेस गावकऱ्यांनी अंगावर घेतले. तसेच एकीकडे न्यायालयीन युद्ध सुद्धा गावकऱ्यांचे सुरू होते. शेवटी आमगाव खुर्द वासीयांना यश मिळाले आणि आमगाव खुर्द ग्राप नगर पंचायत सालेकसा मध्ये समाविष्ट झाले. १२ आगस्ट २०१५ रोजी ब्रजभूषण बैस ह्यानी ग्राम पंचायतीला अर्ज करून ग्राम सभेला हा विषय घेण्यास आग्रह केला त्यानुसार १५ आगस्ट रोजी ला झालेल्या ग्राम सभेत प्रस्थाव पारित करून तशी २० आगस्ट रोजी मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे याचिका दाखल करण्यात आली. याचिका क्र. ७२/२०१५ वर १ ऑक्टोबर २०१५ पासून सुरू असलेल्या न्यायालयीन प्रक्रियेला न्यायमूर्ती श्रीभूषण गवई आणि प्रसन्न वराले ह्यानी शासनाला खडसावून विलीनीकरणाचे आदेश दिले होते मात्र शासनाकडून काहीही कार्यवाही न करता सालेकसा नगर पंचायतची निवडणूक घेण्याचे निर्णय शासनाने घेतला. त्यानंतर याचिकाकर्त्यांनी न्यायालयाची अवमानना असल्याचे पुढे करून अवमानना याचिका क्र. ५९/२०१७ दाखल केली. पण गेंड्याच्या कातडीच्या सरकारने न्यायमूर्ती भूषण गवई आणि इंदिरा जैन ह्यांच्या बेंचवरून झालेल्या आदेशाचे पुनः अवमानना करत आमगाव खुर्द ग्राम पंचायतची निवडणूक लावल्यात आली असता गावकऱ्यांनी त्या निवडणुकीवर बहिष्कार करत एकतेचा संदेश दिला. याचिकाकर्त्यांनी ३०/१०/२०१७ रोजी पुन्हा याचिका क्र. ११६/२०१७ दाखल करून शासनाला योग्य निर्णय घेण्यास भाग पाडले. शेवटी ८ आगस्ट २०१८ रोजी न्यायालयीन युद्धाला पूर्णविराम लागल्याने आमगाव खुर्द गावात आनंदाचा वातावरण निर्माण झाला आहे. ३ वर्षांपासून सुरू असलेल्या युद्धाला आज निकाली लागल्याने तालुक्यात एकच चर्चा सुरू आहे.