25.3 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ जिल्हा परिषद, पंचायत समिती आरक्षण सोडत २७ ऑगस्ट रोजी

जिल्हा परिषद, पंचायत समिती आरक्षण सोडत २७ ऑगस्ट रोजी

0
81

वाशिम, दि. १६ :  वाशिम जिल्हा परिषद व त्या अंतर्गत असलेल्या ६ पंचायत समितींच्या निवडणुकांसाठी प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केला आहे. त्या अनुषंगाने वाशिम जिल्हा परिषद गट  व पंचायत समितींच्या गणांसाठी आरक्षण सोडत दि. २७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता होणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

जिल्हा परिषदेच्या गटांसाठीची सोडत दि. २७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विशेष सभेत होणार आहे. कारंजा पंचायत समितीची सोडत कारंजा तहसीलदार कार्यालयात दि. २७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता, मानोरा पंचायत समितीची सोडत मानोरा तहसीलदार कार्यालयात दि. २७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता, मंगरूळपीर पंचायत समितीची सोडत मंगरूळपीर तहसीदार कार्यालयात दि. २७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता, मालेगाव पंचायत समितीची सोडत मालेगाव तहसीलदार कार्यालयात दि. २७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता, रिसोड पंचायत समितीची सोडत रिसोड तहसीलदार कार्यालयात दि. २७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता व वाशिम पंचायत समितीची सोडत वाशिम तहसीलदार कार्यालयात दि. २७ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता विशेष सभेत होणार आहे. तरी ज्या रहिवाशांना या विशेष सभेस उपस्थित रहायचे आहे, त्यांनी वरील ठिकाणी व वेळी हजर रहावे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.