ओबीसींच्या प्रश्नांवर विचार मंथन

0
9

ब्रह्मपुरी ,दि.२३=ओ.बी.सी.कर्मचारी सह.पत संस्था र्मया.ब्रम्हपुरची साधारण सभा संपन्न झाली.सुरुवातीला संस्थेचे अध्यक्ष प्रभु ठाकरे यांनी अहवाल वाचन केले.सेवानवृत्त कर्मचारी राजेन्द्र उदासी, दामोधर बहेकार, ताजने, पिलारे सर,उरकुडे यांचा शाल व श्रीफळ देउन सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी प्रा.हितेंद्र धोटे यांनी ओबीसींच्या प्रश्नावर एकत्र येऊन संघर्ष करण्याची आवश्यकता सांगितली. प्रा.नामदेव जेंगठे यांनी ओबीसींचे सामाजिक प्रश्न राजकीय पक्षांच्या ओबीसी आघाडया सोडवू शकत नाहीत,सामाजिक चळवळ उभारुनच ओबीसींच्या समस्या सोडविल्या जाऊ शकतात. पतसंस्थेच्या माध्यमातून सामाजिक दायित्व पूर्ण करावे,अशी अपेक्षा व्यक्त केली.अहवाल वाचन सचिव सुजीत खोजरे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा.रविंद्र विखार यांनी केले तर आभार प्रदर्शन अशोक शेंडे यांनी केले.