सोनार समाजाचा गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा

0
16

गोंदिया ,दि.24ः: गोंदिया जिल्हा सोनार समाज ट्रस्ट गोंदियाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा राजस्थानी भवन इसरका मार्केट गोंदिया येथे संपन्न झाला.सर्वप्रथम संत नरहरी महाराजांच्या फोटोला माल्यार्पण करून दीपप्रज्वलन व आरती करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनुराधा गोविंदराव रेभे या होत्या. उद्घाटक म्हणून धर्मेंद्र खरवडे तर मंचावर प्रवीण उदापुरे, अमृतराव यावलकर, इंजि. विजय ढोमणे, राजाराम कावळे, सुरेश हर्षे, राजेंद्र फाये, प्रभाकर ढोमणे, श्यामराव येरपुडे, विठ्ठलराव भरणे, भालेराव पोगळे, रेखा भरणे, कृष्णराव गजापुरे, बाबुराव ढोमळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील भजे यांनी केले. संचालन मधुकर कवळे यांनी केले तर आभार तुषार येरपुडे यांनी मानले.यशस्वितेसाठी संजय बैतुले, नरेंद्र भुजाडे, दिलीप फाये, दिलीप पोवळे, आशिष कावळे, मयूर कावळे, धनराज येरपुडे, त्र्यंबक बेहरे, सचिन बांगरे, हेमंत कावळे, प्रकाश बागडे, प्रमोद हाडगे, दुर्गेश डिब्बे, प्रमोद हाडगे, नरेश खरवडे, मिलिंद खरवडे, जितेंद्र भरणे, विजय टेटे, अरूण हाडगे, दीपक रोकडे आदींनी सहकार्य केले. .