अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा धडक मोर्चा ३0 रोजी

0
7

गोरेगाव,दि.24ः-महाराष्ट्र राज्य अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी यूनियनच्या वतीने विविध प्रलंबित मागण्या व समस्यांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असून अंगणवाडी सेविका व मदतनिसांवर अन्याय होत आहे. अनेकदा मोर्चे काढून शासनाने लक्ष दिले नसून समस्या अजूनही प्रलंबितच आहेत. उलट १६ जुलै २0१८ रोजी अंगणवाडी सेविका व मदतनीस व मिनी विरोधी परिपत्रक काढले, याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ३0 ऑगस्टला जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा काढून जिल्हा परिषदेसमोर परिपत्रकाची होळी करण्यात येणार आहे.
नुकतेच विजया डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. सभेत कॉ.हौसलाल रहांगडाले, कॉ.मिलिंद गणवीर मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी १६ जुलै रोजी काढण्यात आलेल्या परिपत्रकानुसार ज्या अंगणवाडीची पटसंख्या २५ पेक्षा कमी असेल, अशा अंगणवाडींना दुसर्‍या अंगणवाडीत समावेशन करण्यात येणार आहे. हा अंगणवाडी सेविका व मदतनिसांवर अन्याय असून या परिपत्रकांचा जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी विरोध केला आहे. तसेच ३0 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा काढून जिल्हा परिषद कार्यालयासमोर परिपत्रकाची होळी करण्यात येणार आहे, मोच्र्यात अंगणवाडी, बालवाडी सेविका व मदतनिसांनी जास्तीत जास्त संख्येत उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष हौसलाल रहांगडाले, मिलिंद गणवीर, मीना गौतम, आम्रकला डोंगरे, सुनीता मलगाम, पौर्णिमा चुटे, विनीता सहारे, अंजना ठाकरे, भुनेश्‍वरी रहांगडाले, जय कुंवर मच्छिरके, अर्चना मेर्शाम, लिलेशवरी शरणागत, जीवनकला वैद्य, बिरजूला तिडके आदिंनी केली आहे.