26.1 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home विदर्भ बांडे नदीत वाहून गेल्याने युवकाचा मृत्यू

बांडे नदीत वाहून गेल्याने युवकाचा मृत्यू

0
27

गडचिरोली,दि.01 : एटापल्ली तालुक्यातील घोटसुर येथील ईश्वर सन्नू पदा (वय 23) या गुराखी युवकाचा जनावरे चरण्यासाठी जाताना गावाशेजरील बांडे नदीत तोल जाऊन पडल्याने वाहून जाऊन मृत्यू झाला.ईश्वर (ता. 26) रविवारी त्याचे बैल व गायी चरण्यासाठी घेऊन गेला होता. तो रात्री उशिरापर्यंत घरी परत न आल्याने नातेवाईकांनी शोध घेतला. मात्र तो दोन दिवस कुठेही आढळून आला नाही. मंगळवारी (ता. 28) दुपारी 2च्या दरम्यान शोध घेत असताना नदीच्या प्रवाहातील वेलीला लटकलेल्या अवस्थेत ईश्वरचा मृतदेह नातेवाईकांना आढळून आला. संततधार पावसाने गावाशेजारील नाला दुथडी भरून वाहत असताना ईश्वर पदा हा पाय घसरून नाल्यात पडला व वाहून गेला असावा असा गावकऱ्यांचा अंदाज आहे.मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून पुढील तपास कसनसुर पोलीस करीत आहेत.